वॉशिंग्टन: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी घालण्यासाठी भारतानं पूर्ण ताकद पणाला लावली आहे. आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या बैठकीत मसूद अझहरला ग्लोबल दहशतवादी घोषित करण्यात येण्याची शक्यता आहे. भारताच्या मोहिमेला अमेरिकेनंही साथ दिली आहे. अमेरिकी परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रॉबर्ट पल्लादिनो यांनी आम्ही भारताबरोबर असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, मसूद अझहरला ग्लोबल दहशतवादी घोषित केलं पाहिजे.मसूद अझहर हा भारतातील उपखंडांमध्ये नांदणाऱ्या शांततेसाठी धोका आहे. जगात शांतता स्थापित झाली पाहिजे, या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनची सहमती आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी न घातल्यास शांती प्रस्थापित होण्याच्या मोहिमेला धक्का बसेल, असं रॉबर्ट पल्लादिनो म्हणाले आहेत.
मसूदवर बंदी न घातल्यास क्षेत्रीय शांततेला धोका, अमेरिकेचा चीनला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 10:09 IST