शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Mark Zuckerberg: फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गनं गमावली अर्धी संपत्ती, राहतं घरही विकलं! कारण काय? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 18:09 IST

एक वेळ अशी होती की जगातील टॉप-३ श्रीमंत व्यक्तींच्या यादीत फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचा (Mark Zuckerberg) समावेश असायचा. पण सध्या झुकरबर्गचे वाईट दिवस सुरू आहेत.

नवी दिल्ली-

एक वेळ अशी होती की जगातील टॉप-३ श्रीमंत व्यक्तींच्या यादीत फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचा (Mark Zuckerberg) समावेश असायचा. पण सध्या झुकरबर्गचे वाईट दिवस सुरू आहेत. यंदाच्या वर्षात झुकरबर्गच्या नेटवर्थमध्ये तब्बल निम्म्याहून अधिक घसरण झाली आहे. आता झुकरबर्ग सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १७ व्या क्रमांकावर गेला आहे. यातच त्यानं सॅन फ्रान्सिस्कोमधील आपलं घर ३.१ कोटी डॉलरला (जवळपास २.४७ अब्ज रुपये) विकल आहे. यंदाच्या वर्षातील शहरातील सर्वाधिक किमतीला विकलं गेलेलं घर ठरलं आहे. झुकरबर्गनं नोव्हेंबर २०१२ मध्ये हे घर १ कोटी डॉलरला खरेदी केलं होतं. 

१९२८ साली उभारण्यात आलेली ही वास्तू ७ हजार स्वेअरफूट परिसरात पसरलेली आहे. फेसबुकनं जगात धुमाकूळ घालत कोट्यवधींची कमाई केल्यानंतर झुकरबर्गनं हे घर खरेदी केलं होतं. त्यानंतर २०१३ साली झुकरबर्गची पत्नी Priscilla Chan नं या घराच्या डागडुजीसाठी लाखो डॉलर खर्च केले होते. 

रिपोर्टनुसार, झुकरबर्गचं सिलिकॉन व्हॅली, लेक ताहो आणि हवाई येथेही घर आहे. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार झुकरबर्गची नेटवर्थ आता ६१.९ अब्ज डॉलर इतकीच राहिली आहे. यंदाच्या वर्षात झुकरबर्गच्या नेटवर्थमध्ये तब्बल ६३.५ अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. म्हणजेच जवळपास ५०.६ टक्क्यांनी संपत्तीत घट झाली आहे. एकवेळ अशी होती की झुकरबर्ग  १४२ अब्ज डॉलरसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होते. अवघ्या वर्षभरापूर्वी झुकरबर्गनं जुलै २०२१ मध्ये हे स्थान प्राप्त केलं होतं. त्यावेळी फेसबुकच्या शेअरची किंमत ३५० डॉलरच्या जवळ पोहोचली होती आणि कंपनीचं मार्केट कॅप ९५० अब्ज डॉलर इतकं होतं. 

कारण काय?मेटा कंपनीला आता टिकटॉक आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मकडून कडवी टक्कर मिळत आहे. युझर्स आता टिकटॉक आणि यूट्यूबकडे वळत आहेत. त्यामुळे कंपनीच्या मिळकतीवर मोठा परिणाम झाला आहे. यंदाच्या वर्षात कंपनीच्या शेअरमध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाली. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत फेसबुककडे २.९१ अब्ज मासिक अॅक्टीव्ह युझर्स होते. त्याआधीच्या तीन महिन्यांच्या आकडेवारीशी तुलना केल्यास काहीच फरक पाहायला मिळालेला नाही. आज फेसबुकच्या शेअरची किंमत १६६.६५ डॉलर अशी आहे. झुकरबर्गकडे मेटा प्लॅटफॉर्मचे जवळपास १६.८ टक्के शेअर्स आहेत. फेसबुकच्या एकूण मिळकतीपैकी ९७ टक्क्यांहून अधिकचा वाटा जाहिरातींचा आहे.

टॅग्स :Mark Zuckerbergमार्क झुकेरबर्गFacebookफेसबुकMetaमेटा