शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

YouTubeच्या माजी CEOच्या १९ वर्षीय मुलाचा मृत्यू ड्रग्ज ओव्हरडोसमुळे; पोलिस तपासात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 19:34 IST

मृत मुलगा मार्को ट्रॉपरच्या आजीनेही ड्रग्ससेवनाच्या बातमीला दिला दुजोरा

Marco Troper died: जगातील सर्वात मोठी टेक आणि व्हिडिओ कंपनी यूट्यूबचे (YouTube) माजी सीईओ सुसान वोजिकी (CEO Susan Wojcicki) यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. १९ वर्षीय मार्को ट्रॉपर कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या बर्कले कॅम्पसमध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. विद्यापीठाच्या कॅम्पसच्या प्रवक्त्याने सांगितले की, मार्को गेल्या आठवड्यात त्याच्या वसतिगृहात बेशुद्धावस्थेत सापडला होता. हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे बोलले जात आहे. परंतु आता त्या मृत्युबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत.

ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मार्कोचा मृत्यू झाल्याचे पोलीस आणि वसतिगृह प्रशासनाचे म्हणणे असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांकडून केला जात आहे. तसेच, मार्कोची आजी एस्थर वोजिकी म्हणाली की, तिचा नातू ड्रग्ससेवन करायचा, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असू शकतो. मार्को ट्रोपर दुपारच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत आढळला, त्यानंतर बर्कले अग्निशमन विभागाला तात्काळ सतर्क करण्यात आले. कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले पोलिस विभागाच्या म्हणण्यानुसार, सैनिकाचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, उपचार न मिळाल्याने काही वेळातच त्याला मृत घोषित करण्यात आले.

मार्कोच्या आजीचे म्हणणे आहे की मार्कोने एक ड्रग घेतले होते आणि ते कोणते ड्रग होते हे तिला माहीत नाही, पण हे नक्की आहे की ते ड्रग होते. आम्हाला माहीत असते तर कदाचित हे सर्व घडले नसते. तो एक हुशार मुलगा होता आणि सर्वांचा लाडका होता. त्यांचा मृत्यू हृदयद्रावक आहे. तो प्रत्येकाला हवा असणारा मुलगा होता. त्याचे निघून जाणे विसरणे सहज शक्य नाही. इतर कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही ड्रग्ससेवनाबाबत पुढे येऊन स्पष्टपणे बोलत आहोत. मार्कोची आजी असेही म्हणाली की, जर आपण थोडे लक्ष दिले असते तर कदाचित हे घडले नसते. आपल्या मुलांशी बोलणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबDrugsअमली पदार्थ