शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 06:25 IST

तेलवाहू जहाजे नेताना नौदलाशी चर्चा करण्याची इराणची नवी अट

दुबई : इराणच्या निमलष्करी ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने युद्धादरम्यान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत समुद्री सुरुंग पेरले असण्याची शक्यता वर्तवणारा एक नकाशा गुरुवारी प्रसिद्ध केला. इराणच्या निमशासकीय वृत्तसंस्था ‘इसना’ आणि ‘तस्नीम’ यांनी हा नकाशा प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने तेलवाहू जहाजांना ओमानच्या किनारपट्टीऐवजी आता इराणच्या किनारपट्टीजवळून, म्हणजेच उत्तर मार्गाने प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, या मार्गावरून सुरक्षितपणे जाण्यासाठी इराणच्या नौदलाशी समन्वय साधणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. हा नकाशा प्रसिद्ध करून इराणने अमेरिकेवर दबाव निर्माण केल्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे या नकाशात?

इराणने प्रसिद्ध केलेल्या या नकाशामध्ये हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील मुख्य जहाजांच्या मार्गावर फारसी भाषेत ‘धोकादायक क्षेत्र’ असे चिन्हांकित केले आहे. हा मार्ग जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण जगातील एकूण तेल आणि नैसर्गिक वायूच्या व्यापारापैकी २० टक्के व्यापार याच अरुंद मार्गातून होतो. नकाशानुसार, जहाजांना इराणच्या मुख्य भूमीजवळ असलेल्या लारक बेटावरून अधिक उत्तरेकडील मार्गाने प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जहाजांची ये-जा मंदावली

‘केपलर’ या जहाज ट्रॅकिंग संस्थेच्या आकडेवारीनुसार, युद्धबंदीच्या पहिल्या दिवशी या सामुद्रधुनीतून केवळ चार जहाजांनी प्रवास केला. अनेक जहाजांनी आपले ट्रॅकर्स बंद करून (डार्क फ्लिट) प्रवास करणे पसंत केले, जे प्रामुख्याने इराणच्या तेलाची वाहतूक करतात. सध्या सुमारे २३० तेलवाहू जहाजे या सामुद्रधुनीतून बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. इराणने या मार्गावर आता 'टोल' (शुल्क) आकारण्याची आणि जहाजांना स्वतःच्या किनारपट्टीजवळून प्रवास करण्यासची नवी अट घातली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘नाटो’तून बाहेर पडण्याचे संकेत

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी ‘नाटो’चे सरचिटणीस मार्क रुटे यांच्याशी संवाद केला. या भेटीविषयी अधिकृत माहिती ‘नाटो’ने दिलेली नाही; पण बंद दाराआड  बैठकीनंतर ट्रम्प यांनी ‘नाटो’वर तीव्र टीका केली. गरजेच्या वेळी ‘नाटो’ अमेरिकेच्या पाठीशी उभा राहिला नाही, असा त्यांनी पुन्हा आरोप केला.यासंदर्भात ट्रम्प यांनी ‘ट्रूथ सोशल’ या वेबसाइटवर इंग्रजी कॅपिटल अक्षरात ‘आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा नाटो आमच्यासोबत नव्हता, आता पुढेही गरज नसेल,’ असे थेट लिहिले.  त्यांनी असेही संकेत दिले की, इराण युद्धादरम्यान सहकार्य न मिळाल्यास अमेरिका ‘नाटो’मधून बाहेर पडण्याचा विचार करू शकते.

कायदेशीर अडचण

जरी ट्रम्प ‘नाटो’ सोडण्याची भाषा करत असले, तरी २०२३ च्या एका कायद्यानुसार त्यांना काँग्रेसच्या मंजुरीशिवाय या युतीतून बाहेर पडता येणार नाही. सिनेट नेते मिच मॅककॉनेल यांनी ट्रम्प यांना आठवण करून दिली की, ९/११ च्या हल्ल्यानंतर ‘नाटो’ देशांनी अमेरिकेला अफगाणिस्तान आणि इराकमध्ये साथ दिली होती.

तीन पत्रकारांचा मृत्यू

पॅलेस्टाइनच्या गाझा भागातील ‘अल जजीरा’ या वृत्तवाहिनाचा एक वार्ताहर मोहम्मद विशा हा इस्रायलच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला. इस्रायलच्या मते, विशा हा हमाससाठी काम करत होता. तो २०२४ मध्ये हमासच्या एका तुकडीचा कमांडर होता, असे इस्रायलचे म्हणणे आहे. तर लेबनॉनवरील हल्ल्यात हादा दायख आणि सुझान खलील हे दोन पत्रकार ठार झाले. हादा दायख हा सावत अ-फराह या वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी होता तर सुझान खलील हा हिजबुल्लाह चालवत असलेल्या अल-मनार टीव्ही आणि अल-नूर रेडिओचा पत्रकार होता. 

युरोपियन संघ नाराज

युरोपियन संघाने इराणच्या टोलविषयक अटीवर नाराजी व्यक्त केली असून ही वाहतूक विनाशुल्क आणि कोणत्याही कराशिवाय झाली पाहिजे, असे मत बुसेल्समध्ये बैठकीत मांडले गेले. युरोपियन संघाने आंतरराष्ट्रीय कायद्यांचा हवाला देत सर्व देशांना जलवाहतुकीचे स्वातंत्र्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे टोल मागणे हे नियमांच्या विरुद्ध असल्याचे संघाने स्पष्ट सांगितले. जलवाहतुकीचे स्वातंत्र्य ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक संपत्ती असून तिची सुरक्षा निश्चित करणे आवश्यक आहे. या मार्गावरील वाहतूक ही निर्धोक व सुरक्षित होण्यासाठी सर्व उपाययोजना तैनात असाव्या असेही मत मांडले गेले. 

आधी शेकडो लोकं मारली; अता इस्त्रायलची लेबनॉनसोबत चर्चेची तयारी

इराणशी युद्धविराम झाला असला तरी लेबनॉनचा या युद्धविरामात सहभाग नसल्याचे कारण देत इस्रायलने बुधवारी मध्य बैरूत आणि देशाच्या अन्य भागांत व्यापक प्रमाणावर भीषण हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान २०३ नागरिक ठार झाले असून, १००० हून अधिक जण जखमी झाले आहेत. लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांनी या हल्ल्यांना रानटी हल्ले असे म्हटले आहे. इस्रायलचे हल्ले कोणतीही पूर्वसूचना न देता केल्याचा तसेच दुपारच्या वेळेत बाजारपेठेत गर्दी असताना अत्यंत गजबजलेल्या भागात हे हल्ले केल्याचा आरोप लेबनॉनने केला आहे. बुधवारच्या भीषण हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी लेबनॉनसोबत थेट चर्चेचे आदेश दिले असून, 'हिजबुल्लाह'चे नि:शस्त्रीकरण केल्याशिवाय शांतता शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. नेतान्याहू यांनी सांगितले की, त्यांनी लेबनॉनसोबत 'लवकरात लवकर' थेट बोलणी करण्यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's Mined Hormuz Map Sparks Global Fears, Pressures US.

Web Summary : Iran's map reveals potential Hormuz Strait mines, raising global concerns. It advises ships to coordinate with its navy, pressuring the US. Israel bombed Lebanon, killing many, but now seeks talks. Europe opposes Iran's shipping tolls.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणAmericaअमेरिका