शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

युद्ध सुरू होताच युक्रेन आणि युरोपवर अनेक सायबर हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 06:55 IST

अमेरिकी कंपनीचा दावा; काही काळ यंत्रणांवर परिणाम

वॉशिंग्टन : रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेन व युरोपातील अनेक देशांवरही सायबर हल्ले चढविण्यात आले होते. अमेरिकेतील व्हायासॅट या कंपनीने यासंदर्भात म्हटले आहे की, या सायबर हल्ल्यांमुळे युरोपमधील इंटरनेट प्रणालीवर चालणाऱ्या काही यंत्रणांवरही परिणाम झाला होता. मात्र हे हल्ले कुणी केले याबाबत व्हायासॅटने मौन बाळगले आहे. या कंपनीने सांगितले की, या सायबर हल्ल्यांमुळे पोलंडपासून फ्रान्सपर्यंत हजारो इंटरनेटधारकांच्या कामकाजात व्यत्यय निर्माण झाला. युक्रेनपासून युरोपपर्यंत अनेकांच्या इंटरनेट यंत्रणेतील मोडेममध्ये काही काळ बिघाड झाले. मोडेम हे एक हार्डवेअर उपकरण आहे. ज्याचा उपयोग संगणकाला केबल किंवा टेलिफोनच्या माध्यमातून डेटा पाठविण्यासाठी केला जातो. 

युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाच्या हॅकरनी सायबर हल्ले केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. त्याच वेळी व्हायासॅटच्या यंत्रणेवरही सायबर हल्ला झाला होता. या युद्धाच्या कालावधीतील आतापर्यंतचा तो सर्वात मोठा सायबर हल्ला आहे. 

आणखी सायबर हल्ले होण्याचा धोकायुक्रेन युद्धाच्या प्रारंभी झाले तसे सायबर हल्ले युरोपीय देश व युक्रेनवर यापुढेही होण्याचा धोका आहे. तशी शक्यता युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी युरोपने आपली इंटरनेट यंत्रणा आणखी मजबूत करण्याची तयारी केली आहे. 

युक्रेन, रशियात उद्यापासून पुन्हा चर्चायुक्रेन व रशियामधील शांतता चर्चा उद्या, शुक्रवारपासून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पुन्हा सुरू होणार आहे. तुर्कस्थानमध्ये ठरलेल्या मुद्द्यांवर आता दोन्ही देशांतील चर्चेची पुढील फेरी होणार आहे.

रशियाचे परराष्ट्रमंत्री लावरोव भारतात दाखलयुक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव यांचे भारतामध्ये गुरुवारी दोन दिवसांच्या दौऱ्याकरिता आगमन झाले. लावरोव हे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतील.

पुतिन यांची सल्लागारांकडून युद्धाबाबत दिशाभूल सुरू; अमेरिकेचा दावा

n    कीव्ह : युक्रेनच्या युद्धभूमीतील घटनांबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांचे सल्लागार चुकीची माहिती देत आहेत. त्यामुळे दिशाभूल झालेले पुतिन व रशियाचे वरिष्ठ लष्करी अधिकारी यांच्यात तणाव निर्माण झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. पुतिन रशियन लष्कराच्या कामगिरीबद्दल असमाधानी आहेत, असेही अमेरिकेने म्हटले आहे. n    यासंदर्भात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने सांगितले की, रशियाचे संरक्षणमंत्री सेर्गेई शोईगू व पुतिन यांच्यातही मतभेद निर्माण झाले आहेत. याआधी सेर्गेई हे पुतिन यांच्या खूप विश्वासातले म्हणून ओळखले जात.n    युक्रेनमध्ये रशिया त्याला हवी तशी आघाडी घेऊ शकलेला नाही. त्यामुळे रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या युद्धभूमीवरील कामगिरीबद्दल पुतिन यांच्या मनात किंतू निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया