शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अप्रमाणित औषधांमुळे फ्रान्समध्ये अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 05:09 IST

फ्रान्स सरकारच्या ‘एएनएसएम’ या औषधी सुरक्षा व नियंत्रण संस्थेने ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली आहे. ज्यांचा गुणकारी उपयोग अद्याप खात्रीलायकपणे सिद्ध झालेला नाही

पॅरिस : कोरोनावरील रामबाण उपाय म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याचा उदोउदो केला ते मलेरियावरील ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ व ‘लॉपीनॅविर-रिटोनॅविर’ ही एचआयव्हीवरील औषधे दिल्याने फ्रान्समध्ये किमान चार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे, तर इतर किमान १०० रुग्णांच्या प्रकृतीत प्राणघातक गुंतागूंत निर्माण झाली आहे.

फ्रान्स सरकारच्या ‘एएनएसएम’ या औषधी सुरक्षा व नियंत्रण संस्थेने ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली आहे. ज्यांचा गुणकारी उपयोग अद्याप खात्रीलायकपणे सिद्ध झालेला नाही, अशी अन्य आजारांवरील औषधे कोरोनासाठी वापरल्याने फायद्याऐवजी धोका कसा संभवू शकतो, हेच यावरून दिसते. ‘एएनएसएम’ने एका निवेदनात म्हटले की, प्रायोगिक औषधांमुळे २७ मार्चपासून आतापर्यंत फ्रान्समध्ये किमान चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आणखी तिघांना मरता मरता वाचविण्यात आले आहे. याखेरीज इतरही सुमारे १०० कोरोना रुग्णांना या प्रायोगिक औषधांची गंभीर ‘रिअ‍ॅक्शन’ येऊन त्यांची प्रकृती आधी होती त्याहून अधिक खालावल्याचे निष्पन्न झाले आहे.अमेरिका, ब्राझीलसह १३ देशांना निर्यातच्निर्यातबंदी शिथिल केल्यानंतर भारत सरकारने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ हे औषध व त्यासाठी लागणाऱ्या औषधी घटकांच्या निर्यातीसाठी ज्या १३ देशांची पहिली यादी मंजूर केली आहे, त्यात अमेरिका व ब्राझील या देशांचा प्रामुख्याने समावेश आहे.च्निर्यात केल्या जाणाºया ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या गोळ्यांपैकी ३५ टक्के व त्यासाठी लागणाºया औषधी द्रव्यांपैकी ६५ टक्के वाटा अमेरिकेस निर्यात केला जाणार आहे. ज्या इतर देशांना भारत या औषधाची निर्यात करणार आहे त्यांत बहारीन, मॉरिशस, सेशेल्स, डॉमिनिकन प्रजासत्ताक, जर्मनी, स्पेन यांच्यासह नेपाळ, भूतान, बांगलादेश, मालदीव आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFranceफ्रान्सDeathमृत्यू