शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
6
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
7
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
8
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
9
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
10
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
11
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
12
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
13
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
14
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
15
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
16
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
17
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
18
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
19
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
20
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान

मनीषा बनल्या पाकच्या पहिल्या हिंदू महिला डीएसपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 11:28 IST

महिलांचे संरक्षण आणि लैंगिक समानतेला देणार प्राेत्साहन

कराची : प्रचंड विपरित परिस्थितीवर कठाेर संघर्षाद्वारे मात करून पाकिस्तानात प्रथमच एक हिंदू महिला पाेलीस उपअधीक्षक झाली आहे. मनीषा रूपेता असे त्यांचे नाव आहे. अनेक नातेवाईकांनीच त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले हाेते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महिलांचे संरक्षण आणि लैंगिक समानतेला प्राेत्साहन देणे, हे आता आपल्यापुढे लक्ष्य असल्याचे मनीषा रूपेता यांनी सांगितले.

मनीषा या सिंध प्रांतातील जेकाेबाबाद भागातील रहिवासी आहेत. त्या म्हणतात की, अनेक गुन्ह्यांमध्ये महिलांना लक्ष्य करण्यात येते. पाकिस्तानातील पुरुषप्रधान समाजात महिलांचे सर्वाधिक शाेषण हाेते. या महिलांचे संरक्षण करणार असल्याचे त्या म्हणाल्या. रूपेता यांनी गेल्यावर्षी सिंध लाेकसेवा आयाेगाची परीक्षा उत्तीर्ण केली हाेती. त्या १५२ यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये १६व्या स्थानी हाेत्या. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर त्यांची ल्यारी या परिक्षेत्रात पाेलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. रूपेता यांच्या तीन बहिणी डाॅक्टर आहेत तर लहान भाऊ औषधीशास्त्राचे शिक्षण घेत आहे. यापूर्वी उमरकाेट जिल्ह्यातील पुष्पाकुमार यांनीही अशीच परीक्षा उत्तीर्ण करून त्या सिंध प्रांतातील पहिल्या सहायक उपनिरीक्षक झाल्या हाेत्या.

समाजाचा दृष्टिकाेन बदलण्याचा निर्धार मनीषा रूपेता यांनी सांगितले की, मी व माझ्या बहिणींनी लहानपणापासून पितृसत्ताक व्यवस्था पाहिली आहे.  केवळ शिक्षक किंवा डाॅक्टरच हाेऊ शकतात, असे मुलींना या व्यवस्थेत सांगितले जाते. चांगल्या कुटुंबातील मुलींनी पाेलीस किंवा न्यायालयातील कामांपासून दूर राहावे, हा दृष्टिकाेनही मला बदलायचा आहे. 

रूपेता यांच्यासमाेर राहणार आव्हानग्लाेबल जेंडर इंडेक्सनुसार काही वर्षांपूर्वी १५३ देशांच्या यादीत पाकिस्तानचे स्थान १५१ वे हाेते. देशातील ७० टक्के महिला आयुष्यात किमान एकदा तरी घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरल्या आहेत. त्यामुळे रूपेता यांच्यासमाेर माेठे आव्हान राहणार आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसHinduहिंदूPakistanपाकिस्तान