शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून त्यांनी 66 वर्षं वाढवली होती नखं, कारण वाचून आश्चर्य वाटेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 12:22 IST

श्रीधर चिल्लाल यांनी वयाच्या 14 व्या वर्षी नखे वाढवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागची घटनाही तशीच विचित्र आहे.

न्यू यॉर्क-  पुण्यात राहाणाऱ्या श्रीधर चिल्लाल यांनी आपली नखे अखेर काल कापून टाकली आहेत. सलग 66 वर्षे नखं न कापल्यामुळे चिल्लाल यांच्या डाव्या हाताची नखे लांब वाढली होती. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी ही नखं कापण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार न्यू यॉर्क येथे ही नखे कापण्यात आली.

श्रीधर चिल्लाल यांनी वयाच्या 14 व्या वर्षी नखे वाढवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागची घटनाही तशीच विचित्र आहे. त्यांच्या एका शिक्षकांनी वाढवलेले नख श्रीधर यांच्यामुळे तुटले. असे नख तुटल्यामुळे ते शिक्षक त्यांना रागावले होते. मी या नकाची किती काळजी घेतली होती हे तुला समजणार नाही अशा शब्दांमध्ये शिक्षक रागे भरल्यामुळे श्रीधर यांनी डाव्या हाताची नखे वाढवायची ठरवले. त्यानंतर त्यांनी नखे कधीच कापली नाहीत. नखे कापण्यापूर्वी त्यांच्या सर्व नखांची एकत्रित लांबी 29 फूट 10 इंच इतकी होती. त्यांच्या अंगठ्याचे नख सर्वात लांब होते.

नखांच्या काळजीबाबत बोलताना चिल्लाल म्हणतात, ही नखं अत्यंत नाजूक होती. झोपतानाही मला त्यांची काळजी घ्यावी लागायची. प्रत्येक अर्ध्या तासाने उठून नखे दुसऱ्या हाताने उचलून हाताची जागा बदलायला लागायची. नखांमुळे वेदना सहन करायला लागल्या असल्या तरी काहीवेळेस त्यांना त्याचा फायदाही व्हायचा. नखांमुळे त्यांना कोणत्याही रांगेत उभं राहावं लागलं नाही. आता त्यांची नखं रिप्लेज वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय