शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कामावरुन निघाला अन् याचं नशीबच पालटलं, झाला करोडपती; याची गोष्ट वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 15:49 IST

या व्यक्तीला रस्त्यात एक पेपर विकत घेण्याची इच्छा झाली. त्याला याची अजिबातही कल्पना नव्हती की हा पेपरच त्याचं नशीब पालटणार आहे. त्याची नजर पेपरमधील नॅशनल लॉटरीवर पडली आणि काहीच वेळात हा व्यक्ती करोडपती झाला.

एका व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य फॅक्ट्रीमध्ये नोकरी करण्यात जात होतं. सेवानिवृत्तीच्या वयात नाईट शिफ्ट (Night Shift) करून घरी परतत असताना या व्यक्तीला रस्त्यात एक पेपर विकत घेण्याची इच्छा झाली. त्याला याची अजिबातही कल्पना नव्हती की हा पेपरच त्याचं नशीब पालटणार आहे. त्याची नजर पेपरमधील नॅशनल लॉटरीवर पडली आणि काहीच वेळात हा व्यक्ती करोडपती झाला.

फॅक्ट्रीमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीला 2 मिलियन डॉलरची लॉटरी लागली आहे (Factory Worker won Lottery of 2 Millions Dollar). करोडपती बनताच या व्यक्तीने आपल्या मालकाला फोन करून सांगितलं की आता तो कधीच कामावर परत येणार नाही. ही घटना कुम्ब्रियाच्या कार्लिस्ले येथील असून 61 वर्षीय इयान ब्लॅकसोबत घडली आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, इयान पिरेली फॅक्ट्रीमध्ये काम करत होते. (Man Became overnight Millionaire)

इयान ब्लॅक यांनी कामावरून परतताना एक पेपर खरेदी केला. याचदरम्यान त्यांची नजर नॅशनल लॉटरीवर पडली आणि त्यांनी एक स्क्रॅच कार्ड खरेदी केलं. इयान ब्लॅक यांना जेव्हा समजलं की त्यांना लॉटरी लागली आहे, तेव्हा त्यांना प्रचंड आनंद झाला. इयानने घरी जाऊन आपली पत्नी सँड्राला हे तिकिट क्रॉसचेक करण्यास सांगितलं. 61 वर्षाच्या इयान ब्लॅकला 2 मिलियन डॉलर म्हणजेच 14 कोटी रूपयांची लॉटरी लागली होती. या वृद्ध दाम्प्त्याने याआधी कधीही इतके पैसे एकसोबत पाहिले नव्हते.

लॉटरी कन्फर्म होताच इयान ब्लॅक यांनी फॅक्टरीच्या मालकाला फोन करून सांगितलं की इथून पुढे ते कामावर येणार नाहीत. हे ऐकताच फॅक्ट्रीचा मालक आश्चर्यचकित झाला आणि म्हटला, का? नक्की काय झालं? यावर इयानने सांगितलं की त्यांनी 2 मिलियन डॉलरची लॉटरी जिंकली आहे. कपलचं असं म्हणणं आहे, की या पैशांनी ते आपल्या पाळीव श्वानाचं ऑपरेशन करणार आहेत आणि मग जमीन खरेदी करून आपल्या स्वप्नातील घर बांधणार आहेत. त्यांना 5 मुलं आणि दहा नातवांडं आहेत. इयान ब्लॅकचं असं म्हणणं आहे, की ही फक्त त्यांचंच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलणारी घटना आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके