शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

३६० आसनी विमानात 'तो' एकटाच; अवघ्या १८ हजारांत केलेल्या मुंबई-दुबई प्रवासाची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 16:24 IST

इमिरेट्सच्या मुंबई-दुबई विमानात एकटाच प्रवासी; अविस्मरणीय अनुभवानं प्रवासी थक्क

मुंबई: कोरोनामुळे दररोज नव्या संकटांचा सामना करावा लागत आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना आता ब्लॅक फंगसची लागण होऊ लागली आहे. एका बाजूला कोरोनानं सगळ्यांची चिंता वाढवली असताना एका व्यक्तीला कोरोनामुळेच एक अविस्मरणीय अनुभव घेता आला. भावेश झवेरी नावाच्या व्यक्तीनं मुंबई ते दुबई प्रवास विमानानं केला. विशेष म्हणजे यावेळी विमानात प्रवासी म्हणून फक्त भावेश झवेरी होते. बाकी संपूर्ण विमान रिकामी होतं. 'त्या' मेलेल्या मुलाला जिवंत करा! ग्रामस्थांनी चेटकिण समजून दोघींना बेदम मारले; कपडे फाडलेभावेश झवेरी यांनी दुबईच्या तिकिटासाठी १८ हजार रुपये मोजले. मात्र १८ हजारात विमानातून एकट्यानं प्रवास करण्याची संधी मिळेल असा विचार त्यांनी स्वप्नातही केला नव्हता. मात्र इमिरेट्सच्या बोईंग ७७७ या ३६० आसनी विमानातील ते एकमेव प्रवासी होते. 'मी विमानात पाऊल ठेवताच हवाई सुंदरींनी टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं,' असं भावेश झवेरींनी सांगितलं. मी आतापर्यंत २४० हून अधिक वेळा मुंबई-दुबई दरम्यान प्रवास केला. मात्र हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.कुंभकर्णांचं गाव! येथील लोक आठवडाभर राहायचे झोपून, समोर आलं धक्कादायक कारणभावेश यांनी विमान प्रवासादरम्यान कर्मचाऱ्यांसोबत कमांडरशीदेखील संवाद साधला. या कर्मचाऱ्यांनी त्यांना संपूर्ण विमानाची सफर घडवली. विमान प्रवासादरम्यान देण्यात येणाऱ्या सूचनादेखील विशेष होत्या. 'नेहमी विमानातील सर्व प्रवाशांना सूचना देण्यात येतात. मात्र या प्रवासावेळी माझ्यासाठीच सूचना दिल्या गेल्या आणि त्या विशेष होत्या. मिस्टर झवेरी तुमचा सीटबेल्ट बांधा. मिस्टर झवेरी आपण लँड होतोय, अशा सूचना विमानात ऐकू आल्या. हा अनुभव थक्क करणारा होता,' असं भावेश यांनी सांगितलं.भावेश गेल्या २० वर्षांपासून दुबईचे रहिवासी आहेत. कोरोनाच्या संकटामुळे संयुक्त अरब अमिरातीनं विमान प्रवासावर निर्बंध लादले आहेत. त्यानुसार दुबईचे नागरिक, गोल्डन व्हिसा असलेले नागरिक आणि राजदूतांनाच दुबईत येण्याची परवानगी आहे. सर्वसामान्यांना दुबईत प्रवेश नाही. त्यामुळे भावेश झवेरी दुबईला जाणाऱ्या विमानात एकटेच होते.