शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी आला तरुणाच्या कामी; 'ती'ने केलेले आरोप ठरले खोटे अन् टळली बदनामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 19:03 IST

...अन् त्या तरुणाचा 99 वर्षांचा तुरुंगवास टळला

टेक्सास: सेल्फीच्या वेडापायी जीव गमावल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या आणि वाचल्या असतील. मात्र टेक्सासमधील एका तरुणाची तुरुंगवारी केवळ एका सेल्फीमुळे टळली आहे. टेक्सासचा रहिवासी असलेल्या 21 वर्षीय ख्रिस्तोफर प्रिकोपियावर त्याच्या पूर्वाश्रमाच्या प्रेयसीनं गंभीर आरोप केला होता. ख्रिस्तोफरनं घरात घुसून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप तिनं केला. यानंतर पोलिसांनी ख्रिस्तोफरला अटक केली आणि त्याची रवानगी तुरुंगात झाली. मात्र एका सेल्फीमुळे ख्रिस्तोफरचा 99 वर्षांचा तुरुंगवास टळला. ख्रिस्तोफरनं घरात घुसून कटरच्या सहाय्यानं छातीवर एक्स अक्षर काढलं, असा गंभीर आरोप  ख्रिस्तोफरच्या माजी प्रेयसीनं केला होता. 20 सप्टेंबरला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ख्रिस्तोफर आपल्या घरात घुसला होता, अशी माहिती तिनं पोलिसांनी दिली होती. मात्र त्यावेळी आपण आपल्या कुटुंबासोबत बाहेर होतो, असा दावा ख्रिस्तोफरनं केला. मात्र पुरावा नसल्यानं त्याची रवानगी तुरुंगात झाली. काही दिवसांनी दीड लाख डॉलर भरल्यावर त्याला जामीन मिळाला. मात्र 99 वर्षे तुरुंगावासाची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर होती. अखेर आईनं काढलेला एक सेल्फी ख्रिस्तोफरच्या कामी आला. विशेष म्हणजे हा सेल्फी त्याच्या आईनं फेसबुकवर वेळ आणि ठिकाणासह त्याचवेळी शेअर केला होता. त्यामुळे ख्रिस्तोफर 20 सप्टेंबरच्या संध्याकाळी कुटुंबासह बाहेर होता, हे सिद्ध झालं. आपण कुटुंबासोबत ज्या ठिकाणी गेलो होतो, ते ठिकाण माजी प्रेयसीच्या घरापासून 65 मैल दूर आहे, याची माहितीदेखील ख्रिस्तोफरनं पोलिसांना दिला. त्यामुळे पोलिसांनी त्याची निर्दोष मुक्तता केली. मात्र ख्रिस्तोफरवर खोटा आरोप करणाऱ्या माजी प्रेयसीला अद्याप तरी अटक झालेली नाही.  

टॅग्स :Selfieसेल्फीUSअमेरिकाAmericaअमेरिका