शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

64 लाख रुपये घरभाडे थकवल्यामुळे मल्लिका शेरावतची पॅरिसमधल्या घरातून हकालपट्टी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 12:31 IST

आपल्या हॉट, मादक अदांमुळे नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतची पॅरिसमधल्या राहत्या घरातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे.

ठळक मुद्देमल्लिका आणि सिरिल सध्या आर्थिच चणचणीचा सामना करत असल्याचे वकिलाने कोर्टाला सांगितले आहे.मर्डर, प्यार के साईड इफ्केट आणि डबल धमाल हे मल्लिकाचे बॉलिवूडमधील चित्रपट आहेत.

पॅरिस - आपल्या हॉट, मादक अदांमुळे नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतची पॅरिसमधल्या राहत्या घरातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. मल्लिका तिचा फ्रेंच प्रियकर सिरिल ऑग्सेफॅन्ससोबत पॅरिसमध्ये एक अपार्टमेंटमध्ये राहत होती. मल्लिकाने घर मालकाचे 80 हजार युरो म्हणजे 64 लाख रुपयांचे भाडे थकवल्यामुळे तिला घर सोडावे लागले आहे. सध्या या प्रकरणावर पॅरिसमधील न्यायालयात सुनावणी सुरु आहे.  

मागच्यावर्षी मल्लिका आणि सिरिलवर अपार्टमेंटच्या लॉबीमध्ये हल्ला झाला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी दोघांना लुटले होते. या हल्ल्याचा निषेध म्हणून मल्लिका आणि सिरिलने घरभाडे थकवले आहे. घर मालकाबरोबर सुरु असलेल्या वादावर तोडगा निघाल्यानंतर लगेचच थकलेले सर्व भाडे अदा केले जाईल असे दोघांच्या वकिलाने सांगितले. 

मल्लिका आणि सिरिल सध्या आर्थिक चणचणीचा सामना करत असल्याचे वकिलाने कोर्टाला सांगितले आहे. 2016 मध्ये मल्लिकाला चांगले मानधन मिळत होते. त्यामुळे ते सहज थकलेले भाडे भरु शकतात असे घर मालकाच्या वकिलाने कोर्टाला सांगितले. पॅरिसमधील न्यायालय लवकरच या प्रकरणावर निकाल देणार आहे. 

मर्डर, प्यार के साईड इफ्केट आणि डबल धमाल हे मल्लिकाचे बॉलिवूडमधील चित्रपट आहेत. मर्डर सिनेमासाठी मल्लिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात तिने अनेक हॉट सीन्स देऊन इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. 2015 साली तिने डर्टी पॉलिटिक्स चित्रपटात  महत्वाची भूमिका केली होती. राजस्थानमधील भवरी देवीच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट होता असे बोलले होते. या चित्रपटात मल्लिकाने दिवगंत अभिनेते ओमपुरी यांच्यासोबत अनेक हॉट सीन्स केले होते. 

 

टॅग्स :Mallika Sherawatमल्लिका शेरावतbollywoodबॉलीवूड