शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

युनोतून मलिहा लोधींची पाकने केली हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 04:31 IST

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी यांना दूर करून त्यांच्या जागी मुनीर अक्रम यांची नियुक्ती केली आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी यांना दूर करून त्यांच्या जागी मुनीर अक्रम यांची नियुक्ती केली आहे. मुनीर अक्रम हे २००२ ते २००८ या कालावधीत संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी होते.संयुक्त राष्ट्रांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरचा विषय उपस्थित केला होता. ते तेथून मायदेशी परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा महत्त्वाचा खांदेपालट झाला. राजदूत मुनीर अक्रम यांची न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी म्हणून डॉ. मलिहा लोधी यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. लोधी यांना पदावरून का दूर करण्यात आले याचे कारण दिले गेलेले नाही.मोदी म्हणाले होते, ‘भारत हा जगाला युद्ध नव्हे तर बुद्धाचा शांततेचा संदेश दिलेला देश आहे.’ भारताने अनुच्छेद ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान काश्मीरच्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहे. (वृत्तसंस्था)संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण चर्चेत भाषणासाठी जास्तीत जास्त १५ मिनिटे दिली जातात तरीही इम्रान खान यांनी ५० मिनिटे भाषण केले व त्यात निम्मा वेळ काश्मीरच्या प्रश्नावर भर होता. खान इशारा देताना म्हणाले होते की, अण्वस्त्रधारी हे दोन देश एकमेकांसमोर आले तर त्याचे परिणाम त्यांच्या सीमांच्या बाहेर दिसतील. याच व्यासपीठावरून काही मिनिटांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण मात्र शांततेचा संदेश देणारे होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ