शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मित्र छोटा, पण दणका मोठा; पदड्याआडून हालचाली घडवत भारताचा पाकिस्तानला दे धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 15:44 IST

छोट्या देशाला मोठी मदत करत भारताला पाकिस्तानला दणका

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतानंपाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे. मालदिवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या (यूएनजीए) अध्यक्षपदी निवडून आले आहेत. शाहिद संयुक्त राष्ट्राच्या महासभेचे ७६ वे अध्यक्ष असतील. मालदिवसमोर अफगाणिस्तानचं आव्हान होतं. मात्र १४३ विरुद्ध ४८ मतांनी मालदिवचा विजय झाला. शाहिद यांचा विजय पाकिस्तानसाठी जोरदार धक्का मानला जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेचं अध्यक्षपद सध्या वोल्कन बोज्किर यांच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वीच वोल्कन यांनी काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं. यानंतर भारताकडून वोल्कन यांच्यावर टीका झाली. संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा सल्ला वोल्कन यांनी पाकिस्तानला दिला होता. त्यावरून भारतानं वोल्कन यांच्यावर तोफ डागली होती. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अध्यक्षांनी अशी भूमिका घेणं योग्य नाही आणि ते त्यांच्या पदाला शोभणारंदेखील नाही, असे खडे बोल भारताकडून सुनावण्यात आले होते.आता अब्दुल्ला शाहिद संयुक्त राष्ट्राच्या महासभेचे अध्यक्ष असतील. ते वोल्कन यांची जागा घेतील. यामुळे भारताला दिलासा मिळाला आहे. तर पाकिस्तानला झटका बसला आहे. शाहिद यांची निवड होताच भारत सरकारकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. मालदिवनं वर्षभरापूर्वी महासभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला. तेव्हापासून भारतानं मालदिवला प्रचारात मोलाची मदत केली. त्यामुळे मालदिवच्या विजयात भारताचा अप्रत्यक्ष हात आहे. भारत आणि मालदिवचे संबंध अतिशय उत्तम आहेत. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रात भारतानं मालदिवला मदत केली. यानंतर आता मालदिव संयुक्त राष्ट्रातील भारताचे उपस्थायी प्रतिनिधी नागराज नायडू यांना शाहिद यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्त करण्याची शक्यता आहे. त्यासाठी मालदिव भारताशी चर्चा करत असल्याचं वृत्त द हिंदूनं दिलं आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ