शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

रोहिंग्यांना तात्पुरता आसरा देण्यासाठी मलेशियाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:36 IST

म्यानमारमधून गेली दोन ते तीन वर्षे रोहिंग्या थायलंड, इंडोनेशिया, मलेशियाच्या दिशेने समुद्रमार्गे जात आहेत. अत्यंत लहानशा लाकडी बोटींवर कोंबलेल्या अवस्थेत हे रोहिंग्या आग्नेय आशियाई देशांमध्ये पोहोचतात.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी संसदेमध्ये बोलताना भारतातील रोहिंग्यांना परत पाठवण्यात येईल असे जाहीर केले होते.राखिन प्रांतात सुरु असलेला हिंसाचार अयोग्य आहे असे नमूद केलेल्या बाली जाहीरनाम्याला स्वीकारण्यास भारताने नकार दिला आहे.

क्वालालंपूर, दि.8- म्यानमारमधील वांशिक तणावाला कंटाळून पळून जाणाऱ्या रोहिंग्यांना तात्पुरता आसरा देण्याची तयारी मलेशियाने दाखवली आहे. मलेशियाच्या मेरिटाइम एजन्सीच्या प्रमुखांनी याबाबत शुक्रवारी माहिती दिली आहे. म्यानमारमधून गेली दोन ते तीन वर्षे रोहिंग्या थायलंड, इंडोनेशिया, मलेशियाच्या दिशेने समुद्रमार्गे जात आहेत. अत्यंत लहानशा लाकडी बोटींवर कोंबलेल्या अवस्थेत हे रोहिंग्या आग्नेय आशियाई देशांमध्ये पोहोचतात. बऱ्याचवेळा अन्न-पाण्याविना त्यांच्यापैकी अनेकांचा मृत्यूही ओढवतो. त्यामुळे त्यांना बोट पिपल असे म्हटले जाते.मलेशियाकडे येणाऱ्या बोट पिपलची म्हणजे रोहिंग्यांची संख्या आता वाढण्याची शक्यता आहे. कारण 25 ऑगस्टपासून म्यानमारमध्ये वांशिक तणाव सुरु आहे. या तणावातून जीव वाचवण्यासाठी रोहिंग्या नेफ नदी ओलांडून बांगलादेशच्या दिशेने जात आहेत तर समुद्रमार्गाने आग्नेय आशियात जात आहेत.भारताने मात्र रोहिंग्यांना कोणत्याही स्थितीत परत म्यानमारला पाठवले जाईलच अशी भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी संसदेमध्ये बोलताना भारतातील रोहिंग्यांना परत पाठवण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यावर त्यांनी 'आपण जे संसदेत बोललो ते कायद्याला धरुनच बोललो, यूएनएचसीआरसारख्या कोणत्याही संस्थेला आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही' असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. साध्वी प्राची यांनीही रोहिंग्यांच्या विरोधात आपली प्रखर भूमिका स्पष्टपणे व्यक्त केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाकडे मत व्यक्त करताना प्राची म्हणाल्या, 'रोहिंग्या हे इस्लामिक स्टेट पेक्षाही वाईट आहेत. ते अत्यंत कडवे असून त्यांना स्वीकारण्यासाठी कोणताही देश तयार नाही.'त्याचप्रमाणे राखिन प्रांतात सुरु असलेला हिंसाचार अयोग्य आहे असे नमूद केलेल्या बाली जाहीरनाम्याला स्वीकारण्यास भारताने नकार दिला आहे.