शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर 600 वेळा लैंगिक अत्याचार करणा-या बापाला होणार 12 हजार वर्षांची शिक्षा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 18:15 IST

वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मलेशियात उघडकीस आली आहे.

क्वालालंपूर, दि. 10 - वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मलेशियात उघडकीस आली आहे. मलेशियातल्या एका बापानं मुलीवर 600 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून, बाप दोषी आढळल्यास त्याला 12 हजार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 36 वर्षांच्या या घटस्फोटीत आरोपीच्या विरोधातील 626 आरोपांची शहानिशा करण्यासाठी कोर्टाला दोन दिवस लागले आहेत.स्वतःच्या 15 वर्षांच्या मुलीवर बापाकडून करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या 599 आरोपांवर कोर्टानं जवळपास शिक्कामोर्तब केलं असून, त्यात कौटुंबिक व्याज, बलात्कार आणि इतर लैंगिक गुन्ह्यांचा समावेश आहे. मात्र त्याला अद्यापही कोर्टानं दोषी करार दिला नाही. न्यायालय या प्रकरणाचा आणखी अभ्यास करत आहे. जर आरोपी दोषी आढळल्यास त्याला 12 हजार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असंही सरकारी वकील ईमी सय्याझवानी यांनी सांगितलं आहे.लैंगिक गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसारही त्याला शिक्षा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्रत्येक आरोपाखाली त्या व्यक्तीला जवळपास 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते. बलात्काराच्या आरोपात त्याला 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच लैंगिक शोषणाच्या 30 आरोपांखाली त्याला प्रत्येकी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी आरोपीला पळून जाईल या भीतीपायी सद्यस्थितीत तुरुंगवासात ठेवलं आहे. मुलीच्या आईनं 26 जुलै रोजी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान पत्नी घटस्फोट देऊन निघून गेल्यानंतर त्या नराधम बापानं स्वतःच्या मुलीवर अमानुष अत्याचार केला आहे.