शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

पाकिस्तानला मलेशियानं दिला झटका; पैसे दिले नाही म्हणून विमान केलं जप्त, प्रवाशांनाही उतरवलं

By जयदीप दाभोळकर | Updated: January 15, 2021 15:32 IST

मलेशियानं एकतर्फी निर्णय घेतल्याचं पाकिस्तानचा आरोप

ठळक मुद्देमलेशियानं एकतर्फी निर्णय घेतला, पाकिस्तानचा आरोपप्रवासासाठी विमानात बसलेल्या नागरिकांनाही उतरवलं

आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला मित्र म्हणवणाऱ्या मलेशियानंच एक मोठा झटका दिला आहे. पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं बोईंग ७७७ हे विमानमलेशियानं जप्त केलं आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्ताननं हे विमान भाडेतत्त्वावर घेतलं होतं. परंतु पाकिस्ताननं याचे पैसे न दिल्यामुळे हे विमान मलेशियानं जप्त केलं. क्वालालंपूर येथून हे विमान उड्डाणाची तयारी करतानाच मलेशियानं हे विमान जप्त केलं. तसंच यातील चालक दल, कर्मचारी आणि प्रवाशांनाही विमानतळावर उतरवण्यात आलं.पाकिस्तानचं वृत्तपत्र डेली टाईम्सच्या वृत्तानुसार पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सकडे सध्या १२ बोईंग ७७७ विमानं आहेत. ही विमानं त्यांनी वेळोवेळी कंपन्यांकडून ड्राय लीजवर घेतली आहेत. जे विमान मलेशियानं जप्त केलं तेदेखील भाडेतत्त्वारच घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु अटींप्रमाणे रक्कम न भरल्यानं हे विमान क्वालालंपूर विमानतळावर जप्त करण्यात आलं. यापूर्वी इम्रान खान सरकारकडून सौदी अरेबियानं ३ अब्ज डॉलर्स परत मागितले होते. पाकिस्ताननं यासाठी चीनकडून कर्ज घेतलं होतं. तर दुसरीकडे पीआयएनं यासंदर्भात एक ट्विट करत मलेशियानं एकतर्फी निर्णय घेत हे विमान जप्त केल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांचं हे कृत्य अयोग्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी कराचीतील एका डोंगरावर पीआयच्या विमानाचा अपघात झाला होता. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सनं यासंदर्भात वेळोवेळी निरनिराळे खुलासे केले होते. पाकिस्तानचे नागरी उड्डाण मंत्री सरवर खान यांनी काही दिवसांपूर्वी पीआयएचे ४० टक्के वैमानिक वनावट परवानाधारक असल्याचं म्हटलं होतं. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानMalaysiaमलेशियाairplaneविमानAirportविमानतळImran Khanइम्रान खान