शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 15:40 IST

इराण आणि इस्रायल यांच्यातील १२ दिवसांच्या संघर्षानंतर, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी देशाच्या संरक्षण धोरणात मोठे बदल घडवून आणले आहेत.

इराण आणि इस्रायल यांच्यातील १२ दिवसांच्या संघर्षानंतर, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी देशाच्या संरक्षण धोरणात मोठे बदल घडवून आणले आहेत. त्यांनी नुकतेच एका नवीन राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला (National Defence Council) मंजुरी दिली असून, आता या परिषदेच्या प्रमुखपदी अली लारीजानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

६८ वर्षीय लारीजानी हे इराणच्या अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. खामेनी यांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित जनरल अली-अकबर अहमदियन यांच्या जागी लारीजानी यांना नियुक्त केले आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय इराणच्या सत्ताधारी पक्षाचा कट्टरपंथी दृष्टिकोन सोडून अधिक उदारमतवादी धोरणाकडे झुकण्याचा संकेत आहे.

कोण आहेत अली लारीजानी?अली लारीजानी हे एका प्रभावशाली शिया मुस्लिम कुटुंबातून येतात. त्यांनी तत्त्वज्ञानात डॉक्टरेट केली आहे. ते इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे माजी सदस्य आहेत आणि गेल्या तीन दशकांत त्यांनी अनेक महत्त्वाच्या सरकारी पदांवर काम केले आहे. मे २०२० मध्ये खामेनी यांनी त्यांना आपले सल्लागार म्हणूनही नियुक्त केले होते.

राष्ट्रपती बनण्याचे स्वप्न राहिले अपूर्णलारीजानी यांनी तीन वेळा इराणच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. २००५ मध्ये ते सहाव्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर २०२१ आणि २०२४ च्या निवडणुकीतही त्यांना प्रमुख दावेदार मानले जात असतानाही त्यांना निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवण्यात आले.

१९८१ ते १९९२ या काळात लारीजानी यांनी IRGC मध्ये महत्त्वाची पदे भूषवली होती. त्यानंतर, २००५ पासून त्यांनी इराणच्या अणु धोरणाचे नेतृत्व केले. मात्र, दोन वर्षांच्या वाटाघाटीनंतर त्यांनी तत्कालीन अध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे राजीनामा दिला. २००८ ते २०२० या काळात संसदेचे अध्यक्ष असताना त्यांनी जागतिक महासत्तांसोबत झालेल्या २०१५च्या अणु कराराला पाठिंबा दिला होता.

नवीन सुरक्षा परिषदेची भूमिका काय असेल?इराणच्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना युद्धसदृश परिस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी करण्यात आली आहे. या परिषदेचे नेतृत्व अध्यक्ष मसऊद पेजेश्कियान करतील. या परिषदेचा मुख्य उद्देश लष्करी धोरण ठरवणे आणि सैन्याची क्षमता वाढवणे आहे. परिषदेने घेतलेल्या निर्णयांना अंतिम मंजुरी सर्वोच्च नेते अली खामेनेई देतील. मात्र, या परिषदेचे सचिव म्हणून लारीजानी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल, कारण त्यांनाच या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :IranइराणInternationalआंतरराष्ट्रीय