शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
4
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
5
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
6
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
7
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
8
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
9
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
10
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
11
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
12
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
13
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
14
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
15
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
16
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
17
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
18
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
19
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
20
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज

५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 11:32 IST

Mahadev Betting App : महदेव बॅटिंग ॲपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर याला आठवडाभरात भारतात आणले जाऊ शकते.

Saurabh Chandrakar Detained : महादेव बुक बेटिंग ॲप प्रकरणात भारताच्या तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. या बेटिंग ॲपचा मालक सौरभ चंद्राकर याला इंटरपोलने ताब्यात घेतले असून, त्यानंतर त्याला भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाचे पथक महादेव ॲपचा मालक सौरभ चंद्राकरला एका आठवड्याच्या आत भारतात आणू शकते. गेल्या वर्षी सौरभ चंद्राकरला ताब्यात घेण्यात आले होते आणि तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात होता. त्यानंतर आता सौरभवर पुढील कारवाई करण्यात आली असून लवकरच त्याला भारतात आणलं जाणार आहे.

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात भारतीय तपास यंत्रणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  बेटिंग ॲपचा मालक सौरभ चंद्राकर याला इंटरपोलने ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याला भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयची टीम महादेव ॲपच्या मालकाला लवकरच भारतात आणणार आहे. इंटरपोलने यासंदर्भात सीबीआयला माहिती दिली आहे. या प्रकरणी ईडीने यापूर्वीच रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. महादेव ॲपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकरचा डी कंपनीशी संबंध असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. महादेव ॲपविरोधात देशातील अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ॲपबाबत तपास यंत्रणा ईडीकडे तक्रारही करण्यात आली होती.

सौरभ चंद्राकरच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रेड कॉर्नर नोटीस जारी झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये सौरभ चंद्राकरला यूएईमध्ये कारवाई करण्यात आली. ईडीच्या कारवाईवरून सौरभला २०२३ मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. सौरभ चंद्राकरला परत आणण्यासाठी  दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये सहमती झाली आहे. सौरभ चंद्राकर हा सुमारे ५ हजार कोटींच्या फसवणुकीचा सूत्रधार आहे. याप्रकरणात ईडीने रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी बोलावले होते. तू झुठी मैं मक्कारच्या या कलाकारांना ॲपच्या प्रचारासाठी पैसे मिळाल्याची माहिती आहे. बेटिंग ॲपवरून मिळालेल्या पैशाच्या स्त्रोताची माहिती देण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले होते. 

दुसरीकडे, कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांना फेब्रुवारीमध्ये दुबईत एका लग्नात परफॉर्म केल्यानंतर चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. हवालाच्या पैशातून या सेलिब्रिटींना पैसे दिल्याचे ईडीने उघड केले होते. चंद्राकरच्या लग्नासाठी १७ बॉलिवूड सेलिब्रिटींना चार्टर्ड फ्लाइटने दुबईत आणण्यात आले होते, असे ईडीने सांगितले. या सर्वांना हवालाद्वारे कोट्यवधी रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे.

महादेव ॲपवर देशातील अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या ॲपबाबत ईडीमध्ये तक्रारही करण्यात आली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर ५ नोव्हेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने महादेव बेटिंग ॲपसह २२ बेकायदेशीर बेटिंग ॲप आणि वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले. ईडीच्या शिफारशींनंतर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ए अंतर्गत आदेश जारी करण्यात आले. तसेच ८ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई पोलिसांनी महादेव बेटिंग ॲप आणि त्याच्या प्रवर्तकांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आरोपींवर फसवणूक आणि जुगार खेळल्याचा आरोप होता. या प्रकरणी सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांच्यासह ३० हून अधिक जणांवर माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो नंतर मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता आणि नंतर तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. 

टॅग्स :DubaiदुबईEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारी