शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

इंडोनेशियामध्ये 6.2 तीव्रतेचा भूकंप; सुलावेसी बेटावर 35 जणांचा मृत्यू, 700 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 15:03 IST

Indonesia’s Sulawesi island Earthquake : भूकंपामुळे काही क्षेत्रातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

इंडोनेशियामध्ये 6.2 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. सुलावेसी बेटावर झालेल्या या भूकंपामध्ये आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला असून 700 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रात्री 1.28 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा पहिला मोठा धक्का जाणवला. सध्या मदतकार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इंडोनेशियाची न्यूज एजन्सी बीएनपीबीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे गव्हर्नर कार्यालय, हॉटेल्स, घरं आणि स्थानिक आरोग्य केंद्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

जवळपास 15 हजार लोकांनी भूकंपामुळे आपलं राहतं घर सोडलं आहे. तसेच काही लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. भूकंपामुळे काही परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच टेलिफोन नेटवर्कचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भूकंपामध्ये एका मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर एक विमान बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. उड्डाणानंतर अवघ्या 4 मिनिटांत 62 प्रवासी असलेलं विमान बेपत्ता झालं असून सर्च ऑपरेशन सुरू होतं. रिपोर्टनुसार, श्रीविजय एअरचे 182 हे विमान एकूण 62 प्रवाशांना घेऊन निघाले होते. इंडोनेशियातील सोशल मीडियावर याबाबतचे काही फोटो जोरदार व्हायरल झाले होते. फ्लाइट रेडार 24 अनुसार, (FlightRadar24) हे विमान तब्बल 26 वर्षे जुन्या बोइंग 737-500 साखळीतील होतं. या विमानाने शनिवारी संध्याकाळी जकार्ताच्या सोकार्नो-हट्टा विमानतळावरून उड्डाण केले होतं. मात्र उड्डाणानंतर अवघ्या चार मिनिटानंतर या विमानाचा संपर्क तुटला. 

 

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाEarthquakeभूकंपDeathमृत्यू