शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मादागास्करमध्ये प्लेगच्या साथीनं आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 17:55 IST

आफ्रिका खंडाच्या पूर्वेस असणा-या मादागास्कर बेटावर प्लेगची साथ पसरली आहे. ऑगस्ट महिन्यात पसरलेल्या या साथीत आजवर 23 जणांचा मृत्यू झाल्याचे व 230 जणांना प्लेगची लागण झाल्याचे बीबीसीने म्हटले आहे.

मादागास्कर - आफ्रिका खंडाच्या पूर्वेस असणा-या मादागास्कर बेटावर प्लेगची साथ पसरली आहे. ऑगस्ट महिन्यात पसरलेल्या या साथीत आजवर 23 जणांचा मृत्यू झाल्याचे व 230 जणांना प्लेगची लागण झाल्याचे बीबीसीने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संस्थेने मादागास्करमध्ये प्लेग पसरू नये म्हणून 10 लाखांहून अधिक प्रतिजैविक औषधे पाठवली आहेत.28 ऑगस्ट रोजी मोरामंगा येथे या साथीतील पहिला मृत्यू नोंदवण्यात आला त्यानंतर प्लेगला बळी पडणा-या लोकांची संख्या वाढतच गेली. वास्तविक मादागास्कर बेटावर प्लेग हा रोग नवा नाही. दरवर्षी मादागास्करमध्ये प्लेगची 400 लोकांना लागण झालेले दिसून येते. मात्र ते सगळे ब्युबॉनिक प्लेगचे रुग्ण असतात, आता आलेली साथ ही न्युमॉनिक प्लेगची असून ती जास्त धोकादायक आहे. ही साथ पूर्व मादागास्कर आणि अँटनानारिवो प्रांतांमध्ये पसरलेली आहे. प्लेग रोखण्यासाठी मादागास्करचे पंतप्रधान ऑलिव्हर महाफेली सोलोंद्रासना यांनी सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदीचे आदेश दिले आहेत. ३० सप्टेंबरपासून विद्यापीठे व ५ ऑक्टोबरपासून सार्वजनिक उपक्रमातील शाळा बंद ठेवण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत.जागतिक आरोग्य संस्थेचे मादागास्कर प्रतिनिधी शार्लोट दिये यांनी याबाबत बोलताना सांगितले, वेळेत लक्षात आलं तर प्लेग बरा होण्यासारखा आहे. 'प्लेगचा धोका असणा-या लोकांच्या मदतीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्लेगबाधितांसाठी जितक्या वेगवान हालचाली आम्हाला करता येतील तितके चांगले होईल.' प्लेग जगातून नाहीसा झाला असे वाटत असतानाच आजही आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेत प्लेगच्या साथी डोके वर काढत असतात. मादागास्करमध्ये भारतीय जहाजांतून 1898 साली प्लेग गेल्याचे सांगण्यात येते. प्लेगचे संक्रमण रोखण्यासाठी मादागास्करने चांगले प्रयत्न केले असले तरी 2004-2009 या काळात जगातील प्लेगबाधितांपैकी 30% रुग्ण मादागास्करमध्ये होते, असे एका निरीक्षणातून नोंदले गेले आहे.