Guinea Political Crisis: विश्वासघात! राष्ट्राध्यक्षांच्या डोक्यावर छत्री धरणाऱ्यानेच बळकावली खूर्ची; गिनीत तख्तापालट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 11:37 AM2021-09-07T11:37:55+5:302021-09-07T11:40:37+5:30

Lt Col Mamady Doumbouya :  रविवारी सायंकाळी राष्ट्राध्यक्ष अल्फा कोंडे यांना ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी हलविण्यात आले आहे. सैनिकांच्या ताब्यात असतानाचा कोंडे यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. देशात लोकशाही स्थापित करण्यासाठी ममादीने कोंडे यांची साथ दिली होती.

Lt Col Mamady Doumbouya: Soldiers detain Guinea's president, dissolve government | Guinea Political Crisis: विश्वासघात! राष्ट्राध्यक्षांच्या डोक्यावर छत्री धरणाऱ्यानेच बळकावली खूर्ची; गिनीत तख्तापालट

Guinea Political Crisis: विश्वासघात! राष्ट्राध्यक्षांच्या डोक्यावर छत्री धरणाऱ्यानेच बळकावली खूर्ची; गिनीत तख्तापालट

Next

कॉनाक्री : पश्चिमी आफ्रिकन देश गिनीमध्ये (Guinea) तख्तापालट झाले आहे. राष्ट्राध्यक्षांच्या मागे छत्री घेऊन उभे राहणाऱ्या कर्नलनेच त्यांची खूर्ची बळकावली आहे. या बंडखोर लष्कराने अद्याप गिनीमध्ये सरकार बनविण्याची कोणतीही घोषणा केलेली नसली तरी देखील या धक्कादायक घटनेमुळे जगात चर्चा होऊ लागली आहे. अफगाणिस्तानमुळे गिनीतील घटना दुर्लक्षित राहिली असली तरी ही पाठीत वार करण्याची घटना आश्चर्यचकित करणारी आहे. (Military coup in Guinea: Removal of president)

कर्नल ममादी डोंबोयाने (Mamady Doumbouya) गिनीच्या सर्व सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कर्नल ममादी डोंबोया हे गेल्या 12 वर्षांपासून राष्ट्राध्यक्षांचे एकदम खासमखास, अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते. असे अनेक फोटो आहेत, त्यामध्ये ममादी राष्ट्राध्यक्षांच्या मागे त्यांच्या डोक्यावर छत्री घेऊन उभे असलेले दिसून येतील. याच व्यक्तीने विश्वासघात केला आहे. 

रविवारी सायंकाळी राष्ट्राध्यक्ष अल्फा कोंडे यांना ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी हलविण्यात आले आहे. सैनिकांच्या ताब्यात असतानाचा कोंडे यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. देशात लोकशाही स्थापित करण्यासाठी ममादीने कोंडे यांची साथ दिली होती. त्यानेच रविवारी बंडखोरी केली. गिनीच्या इतिहासात पहिल्यांदाच 2010 मध्ये निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी कोंडे प्रचंड बहुमताने निवडून आले होते. गेल्या वर्षी सलग तिसऱ्यांदा ते जिंकले. या काळात ममादीने त्यांना सावलीसाठी साथ दिली होती. 

ममादी हे गिनीच्या स्पेशल फोर्सचे प्रमुख आहेत. ही स्पेशल फोर्स थेट राष्ट्राध्यक्षांनाच रिपोर्ट करते. ममादी हे 2010 पूर्वी अनेक वर्षे बुर्कीना फासोमध्ये राहिले होते. त्यांनी अमेरिका आणि फ्रान्सच्या सैन्याकडून कमांडोचे ट्रेनिंग घेतले होते. राष्ट्राध्यक्ष भवनाजवळ प्रचंड गोळीबारानंतर राष्ट्राध्यक्ष अल्फा कोंडे यांचे सरकार भंग केल्याचे एका बंडखोर अधिकाऱ्याने सरकारी टीव्हीवर जाहीर करून टाकले. 

Web Title: Lt Col Mamady Doumbouya: Soldiers detain Guinea's president, dissolve government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.