शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

63 वर्षांनंतर Crush ला केलं प्रपोज! हायस्कूलमध्ये पडले होते प्रेमात, आता करणार लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 10:07 IST

ही कहाणी आहे अमेरिकेत राहणाऱ्या 78 वर्षांच्या थॉमस मॅकमीकिन आणि नॅन्सी गॅम्बेल यांची. 

एका वृद्ध जोडप्याची प्रेमकहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तब्बल 63 वर्षांनंतर दोघे पुन्हा भेटले आहेत. हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांची पहिली भेट झाली. अभ्यासादरम्यान ते प्रेमात पडले. मात्र वैयक्तिक कारणांमुळे हे जोडपे वेगळे झाले. आता इतक्या वर्षांनी ते पुन्हा एकत्र आले असून लग्न करणार आहेत. दरम्यान, ही कहाणी आहे अमेरिकेत राहणाऱ्या 78 वर्षांच्या थॉमस मॅकमीकिन आणि नॅन्सी गॅम्बेल यांची. 

दोघेही 60 च्या दशकात एकमेकांना भेटले होते. नॅन्सी यांना पाहून थॉमस त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी ते हायस्कूलमध्ये शिकत होते. कालांतराने ते दोघं एकत्र आले. मात्र शाळा संपल्यानंतर वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यामुळे ते एकमेकांपासून लांब झाले. पण, कधी कधी दोघे एकत्र फिरायला किंवा पार्टी करायला जात होते. मात्र, लग्नानंतर त्यांनी एकमेकांना भेटणे बंद केले. नॅन्सी आणि थॉमस यांनी वेगवेगळे लग्न केले. 

वर्षानुवर्षे त्यांच्यात संपर्क नव्हता. पण 2012 मध्ये 50 व्या हायस्कूलच्या रियुनियनमध्ये ते पुन्हा भेटले. यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले, पण अंतर राहिले. अखेर 2022 च्या शेवटी नशिबाने वळण घेतले आणि हे जोडपे पुन्हा एकत्र आले. दरम्यान, नॅन्सी यांच्या पतीचे निधन झाले आहे. तसेच, थॉमस यांचीही पत्नी नाही आहे. अशा परिस्थितीत या जोडप्याने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोघांच्या घरच्यांनीही होकार दिला. 

गेल्या आठवड्यात जेव्हा नॅन्सी या टँपा विमानतळावर पोहोचली तेव्हा थॉमस यांनी तिला प्रपोज केले. यावेळी दोघांचे नातेवाईक उपस्थित होते. आता हे जोडपे लवकरच लग्न करण्याचा विचार करत आहेत. त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. थॉमस यांनी 'फॉक्स 13' ला सांगितले की, ते गेल्या सोमवारी खरेदीसाठी गेले होते आणि आता कॅलिफोर्नियामध्ये लग्न करण्याचा विचार करत आहे.

"नॅन्सी माझी क्रश होती. ती एक सुंदर आणि दयाळू मनाची स्त्री आहे. आम्ही कॉलेजमध्ये डेट केले, पण नंतर ब्रेकअप झाले. मात्र सुदैवाने आम्ही पुन्हा भेटलो. मला माझे उर्वरित आयुष्य नॅन्सीसोबत घालवायचे आहे", असे थॉमस म्हणाले. तर नॅन्सी म्हणाल्या की, "आम्ही बोलणे, ईमेल करणे आणि मजकूर पाठवणे सुरू केले आहे. आम्हाला दीर्घ आयुष्याचा अनुभव आहे."

टॅग्स :AmericaअमेरिकाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट