शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Love Story: मुलाखतीदरम्यान ५५ वर्षांच्या बॉसच्या प्रेमात पडली २५ वर्षांची तरुणी, त्यानंतर घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 16:33 IST

Love Story: एक २५ वर्षांची तरुणी पार्ट टाईम जॉबसाठी एका हॉटेलमध्ये गेली. तिथे तिची मुलाखत घेण्यासाठी हॉटेलचे ५५ वर्षीय जनरल मॅनेजर पोहोचले. त्यांना पाहताच ही तरुणी त्यांच्या प्रेमात पडली. त्यांच्या नात्याला आता ३ वर्षे होत आली आहेत.

वॉशिंग्टन - एक २५ वर्षांची तरुणी पार्ट टाईम जॉबसाठी एका हॉटेलमध्ये गेली. तिथे तिची मुलाखत घेण्यासाठी हॉटेलचे ५५ वर्षीय जनरल मॅनेजर पोहोचले. त्यांना पाहताच ही तरुणी त्यांच्या प्रेमात पडली. त्यांच्या नात्याला आता ३ वर्षे होत आली आहेत. तसेच हा काळ फार आनंददायी असल्याचे या दोघांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील जॅक्शन लेक येथील राहणाऱ्या २५ वर्षीय सुजान डियाज २०१८ मध्ये एका पार्टटाइम जॉबच्या शोधात होती. तेव्हा ती युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती. तसेच अतिरिक्त पैसे कमावण्याच्या प्रयत्नात होती. याचदरम्यान, सुजाना हिला एका स्थानिक हॉटेलमध्ये असलेल्या नोकरीबाबत माहिती मिळाली. सुजाना ही त्या रेस्टॉरंटमध्ये गेली आणि जवळच्या बूथमध्ये बसून नोकरीसाठी अर्ज लिहित होती. त्याचवेळी कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने वळून पाहिले तर ते त्या रेस्टॉरंटचे ५५ वर्षीय जनरल मॅनेजर टोनी कहानेक हे होते. ते तिथे सुजाना हिची मुलाखत घेण्यासाठी पोहोचले होते.

या भेटीतील चर्चेवेळी दोघांनाही एकमेकांविषयी सुप्त आकर्षण वागले. त्यामुळे टोनी यांनी सुजानाकडे तिचा फोन नंबर मागितला. दुसऱ्या दिवशी सुजाना हिला टोनी यांचा एक मेसेज मिळाला. त्यानंतर ते एकमेकांशी बोलू लागले. काहि दिवसांनंतर ते दोघेही डिनरवर गेले.

सुरुवातीच्या काळात त्यांनी हे नातं गुप्त ठेवलं. मात्र काही काळानंतर टोनी यांनी सुजान हिला आपल्यासोबत शिफ्ट होण्यास सांगितलं. तेव्हा आता या नात्याबाबत पालकांना सांगावं लागेल, याची जाणीव सुजान हिला झाली. सुरुवातीला तिच्या पालकांचा यावर विश्वास बसला नाही. मात्र मुलीच्या आनंदाचा विचार करत त्यांनी टोनी यांना आपल्या कुटुंबाचा भाग बनवले. टोनी यांच्या आईनेही या नात्याला मान्यता दिली.

मात्र टोनी आणि सुजाना यांचे काही मित्र मात्र या नात्याबाबत तितकेसे खूश नव्हते. सुजान हिने सांगितले की, आपल्या वयाच्या पार्टनरसोबत राहण्यापेक्षा कुठल्याही मॅच्युअर व्यक्तीसोबत नात्यात राहणं चांगलं.

आता या नात्याला तीन वर्षे झाली आहेत. तसेच सुजान आणि टोनी एकमेसांसोबत घालवलेला तीन वर्षांचा काळ हा सर्वात आनंददायी असल्याचे सांगतात.     

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJara hatkeजरा हटकेUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय