शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ब्राझीलमध्ये सर्वाधिक लांब विजेचा विक्रम, ७०० किमी होता विद्युल्लतेचा लखलखाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 02:17 IST

या विजेने नवा जागतिक विक्रम नोंदवला असून, आजपर्यंतची ही सर्वांत जास्त लांबीची चमकलेली वीज मानली जात आहे.

संयुक्त राष्ट्र : ब्राझीलमध्ये मागील वर्षी ७०० किलोमीटर लांबीची वीज आकाशात लखलखली होती व हे अंतर बोस्टन-वॉशिंग्टन डीसीमधील अंतराच्या बरोबरीचे होते. या विजेने नवा जागतिक विक्रम नोंदवला असून, आजपर्यंतची ही सर्वांत जास्त लांबीची चमकलेली वीज मानली जात आहे.जागतिक हवामान विज्ञान संघटनेच्या समितीच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे की, सर्वांत जास्त लांबीची वीज व सर्वांत जास्त काळ आकाशात चमकलेल्या विजेचा विक्रम अनुक्रमे ब्राझील व अर्जेंटिनामध्ये नोंदले गेले आहेत. विजेच्या चमकवरून आकार व अवधीच्या तुलनेत हे दुप्पट क्षमतेचे विक्रम आहेत.दक्षिण ब्राझीलमध्ये मागील वर्षी ३१ आॅक्टोबर रोजी आकाशात लखलखलेली वीज ७०० किलोमीटर एवढी लांब होती. हे अंतर लंडन व स्वीत्झर्लंडच्या बासेलमधील अंतराएवढे आहे.यापूर्वी अमेरिकेच्या ओक्लाहोमा प्रांतात २००७ मध्ये दिसलेली वीज ३२१ किलोमीटर लांबीची होती.उत्तर अर्जेंटिनामध्ये ४ मार्च २०१९ रोजी आकाशात तब्बल १६.७३ सेकंद वीज लखलखत होती. त्यापूर्वी दक्षिण फ्रान्समध्ये आॅगस्ट २०१२ मध्ये ७.७४ सेकंद वीज चकाकली होती.हे दोन्ही विक्रम असाधारण आहेत, असे संयुक्त राष्टÑांच्या समितीचे म्हणणे आहे.

टॅग्स :Brazilब्राझील