शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊन सैल, लॉकअपमधून बाहेर पडण्याच्या दिशेनं प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 03:00 IST

लोकांनीही त्यांना साथ दिली आणि आता परिस्थिती अशी आहे की, न्यूझीलंड देश आता लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याची तयारी करीत आहे.

न्यूझीलंडने कोरोनावर यशस्वी मात केली. तसं करणारा न्यूझिलंड हा जगातला पहिला देश ठरला, असं अनेक माध्यमांनी नुकतंच प्रसिद्ध केलं. तसं दूरचित्रवाहिन्यांनीही दाखविलं, पण प्रत्यक्षात तसं नाही. तसं न्यूझिलंडच्या पंतप्रधानांनीदेखील स्पष्ट केलं आहे. मात्र, त्यांच्याकडील कम्युनिटी स्प्रेड अर्थात स्थानिकांना होणारा संसर्ग थांबला असून, अजूनही काही संसर्ग रुग्ण आढळत आहेत.मात्र, त्यावेळी काय खबरदारी घ्यायची, नेमकं काय करायचं, याचं नियोजन आणि अंमलबजावणी आता त्यांना जमली आहे. पंतप्रधान जेसिका आर्डन सांगतात की, ‘आमच्याकडे शून्य रुग्णसंख्या अजूनही झालेली नाही, पण झिरो टॉलरन्स फॉर कोरोना केसेस’ हे धोरण आम्हाला साधलेलं आहे.’ लॉकडाऊनचे नियम देशभर कठोरपणे पाळले जातील, यासाठी अत्यंत कठोर आणि नियोजित पावलं उचलली. त्याचं धोरण यासंदर्भात कडक होतं. नियम मोडणाऱ्या मंत्र्यांनाही त्यांनी प्रसंगी शिक्षा केली आहे.लोकांनीही त्यांना साथ दिली आणि आता परिस्थिती अशी आहे की, न्यूझीलंड देश आता लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याची तयारी करीत आहे. लॉकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीत आता थोडी सूट मिळू शकते. टप्प्याटप्प्यानं जनजीवन सुरळीत सुरू करता येईल का, याचं नियोजन आणि अंमलबजावणीही न्यूझिलंडने सुरूकेली आहे. चौथ्याऐवजी तिसºया प्रतलावरचं लॉकडाऊन आता तिथं असेल. म्हणजेच लोकांना बाहेर फिरायला जायला, जवळचा प्रवास करायला, आॅफिसला जायला मुभा आहे. हॉटेलमधून पदार्थ पॅक करून घरी घेऊन जायलाही परवानगी देण्यात आली आहे. आज जितका वेळ लोक बाहेर आता त्यापेक्षा थोडी जास्त सवलतही आता देण्यात आली आहे.येत्या बुधवारपासून शाळाही उघडत आहेत. अर्थात, पंतप्रधानांनीही सांगितलं आहे की, ज्यांना घरून काम करणं, आॅनलाईन शिकणं शक्य आहे, त्यांनी ते घरूनच करा. अजून पूर्ण धोका टळलेला नाही. कारण कोरोना संसर्गावर अद्यापही औषध सापडलेलं नाही.त्याचा परिणाम असा झाला की, आता लोक गाड्या घेऊन घराबाहेर पडलेत. ट्रॅफिकचा आवाज पुन्हा येऊ लागला आहे. समाजमाध्यमात काहींनी त्यासंदर्भात नाराजीही व्यक्त केली की, अजून धोका पूर्णपणे टळलेला नसताना इतपत मोकळीक सरकारने देणं योग्य नाही. मात्र, पंतप्रधानांचं म्हणणं आहे की, आमच्या व्यवस्था सज्ज आहेत आणि लोकजबाबदार आहेत, त्यामुळे कोरोना आटोक्यात राहील याची काळजी घेण्यात येईल. लॉकडाऊनच्या बाहेर पडण्याचे मार्गही हळूहळू दिसू लागलेत, ही चांगली गोेष्ट आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस