शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ‘लॉकडाउन’! 1 कोटी लोकांना घरात राहण्याचे निर्देश, वर्क फ्रॉम होम लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 19:49 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर या शहरातील लोकांना इशारा देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसमुळे घरात राहण्याच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या असतील. लॉकडाऊनमुळे जगभरातील कोट्यवधी लोकांना त्यांच्या घरात कैद व्हावे लागले होते. दरम्यान, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या थायलंडची राजधानी बँकॉकमधील रहिवाशांसाठी पुन्हा असाच आदेश जारी करण्यात आला आहे. या शहराची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे. WHO च्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने बँकॉक आणि शेजारील प्रांतातील लोकांना घराबाहेर न पडण्याचा फर्मान जारी केला आहे.

यावेळी कारण कोविड-19 नसून दरवर्षी सुमारे 70 लाख लोकांचा जीव घेणारा 'राक्षस' आहे. वायुप्रदूषण असे या राक्षसाचे नाव आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वाढत्या प्रदूषणाबाबत बँकॉक आणि त्याच्या शेजारील प्रांतांसाठी इशारा जारी केला आहे. WHO ने म्हटले आहे की थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये PM2.5 ची पातळी सामान्यपेक्षा 14 पटीने वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने लोकांना जास्तीत जास्त घरातच राहावे, असा सल्ला दिला आहे.

बँकॉकच्या हवेत विष सुंदर समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध असलेल्या बँकॉकच्या हवेत विष मिसळले आहे. एअर क्वालिटी ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म IQAir नुसार, बँकॉकची हवेची गुणवत्ता सध्या जगातील सहाव्या क्रमांकावर आहे. थायलंडच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने सांगितले की खराब हवामान, वाहनांचा धूर आणि शेतात लागलेल्या आगीमुळे धोकादायक कॉकटेल बनले आहे. त्यामुळे येथे श्वास घेणेही कठीण होत आहे.

घरून काम करावाहनांचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी लोकांना घरातून काम करण्यास प्रवृत्त करत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून शाळांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम लोकांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. लोक डोळ्यात जळजळ झाल्याची तक्रार करत आहेत. तसेच श्वास घेण्यासही त्रास होत आहे.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयLock Uppलॉक अपWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना