शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

देशातील वृद्ध महिलांच्या नशिबी अगतिकतेचे जिणे!

By admin | Updated: March 24, 2015 02:22 IST

देशातील वृद्ध महिलांना वयासंबंधी भेदभाव, गैरव्यवहार आणि शोषणाचा सामना करावा लागत असल्याचे धक्कादायक सत्य अलीकडेच करण्यात आलेल्या एका अध्ययनात समोर आले आहे.

नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याच्या मावळतीला शांतीने जगता यावे यासाठी विविध पातळींवर प्रयत्न सुरू असतानाच देशातील वृद्ध महिलांना वयासंबंधी भेदभाव, गैरव्यवहार आणि शोषणाचा सामना करावा लागत असल्याचे धक्कादायक सत्य अलीकडेच करण्यात आलेल्या एका अध्ययनात समोर आले आहे. मूलभूत अधिकारांबद्दल असलेला जागरूकतेचा अभाव हे यामागील प्रमुख कारण आहे.एजवेल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅडव्होकसी सेंटरतर्फे २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ३३० जिल्ह्यांमधील ५०,००० वयोवृद्ध महिलांचे (२७,००० ग्रामीण आणि २२५०० शहरी) सर्वेक्षण करण्यात आले. भारतातील वयोवृद्ध महिलांसोबत होणारा पक्षपात हा या सर्वेक्षणाचा विषय होता.दिल्लीसाठी करण्यात आलेल्या स्वतंत्र अध्ययनात राजधानीतील अनियोजित आणि निम्ननियोजित वसाहतींमध्ये नियोजित वसाहतींच्या तुलनेत कुटुंबात वृद्ध महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले. २०११ च्या जनगणनेनुसार दिल्लीत ६.५ लाख वृद्ध महिला असून येथे वृद्धांची एकूण लोकसंख्या जवळपास ५१ टक्के आहे. देशव्यापी सर्वेक्षणात ८९.३८ टक्के वृद्धांनी त्यांच्या कुटुंबात वृद्ध महिलेची स्थिती पुरुषांच्या तुलनेत अत्यंत वाईट असल्याचे सांगितले. लिंगभेदामुळे भारतीय कुटुंबात वृद्ध महिलांचे वर्चस्व नेहमीच नाकारले जाते, असे ८४.०७ टक्के वृद्धांनी मान्य केले, तर केवळ ११.४६ टक्के लोकांनी (८.५ टक्के ग्रामीण व १५.५ टक्के शहरी) कुटुंबात वर्चस्वाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा लिंगभेदाला महत्त्व दिले जात नाही, असे मत मांडले आहे. अध्ययनात सहभागी प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीने (५०.५९ टक्के) महिलांना वृद्धावस्थेमुळे एकाकी आणि उपेक्षित जीवन जगावे लागत असल्याचे सांगितले. सर्वेक्षणात सहभागी ग्रामीण भागातील निम्म्या लोकांना मात्र वृद्ध महिलांचे एकाकीपण आणि लिंगभेदाचा काहीही संबंध नसल्याचे वाटते. आरोग्याची काळजी घेण्याच्या मुद्यावर २२,५४९ वृद्ध महिलांसह ४३,०६३ वृद्धांनी कुटुंबात पुरुषांच्या आरोग्याची जेवढी काळजी घेतली जाते तेवढी महिलांची घेतली जात नाही, असा दावा केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)४८०.४९ टक्के लोकांच्या मते वृद्ध महिलांची आर्थिक स्थिती डळमळीत असते. १७.३६ टक्के लोकांना मात्र असे वाटत नाही. ४शहरी भागात वृद्ध महिलांच्या कायदेशीर हक्कांचे उल्लंघन ही सर्वसामान्य गोष्ट.४वृद्ध पुरुषांच्या तुलनेत वृद्ध महिलांच्या मानवाधिकारांच्या पायमल्लीचे प्रमाण जास्त४वृद्धापकाळात लिंगभेदाला सामाजिक आणि धार्मिक प्रथा कारणीभूत४संयुक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास आणि विभक्त कुटुंब पद्धतीचा पुरस्कार यामुळे वृद्धांसोबत पक्षपातात वाढ४सखोल अध्ययन केले असता ७०.२४ टक्के वृद्ध पुरुष आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे निदर्शनास आले; परंतु वृद्ध महिलांच्या बाबतीत मात्र आर्थिक स्वातंत्र्यांचे प्रमाण फक्त ५१.४५ टक्केच आहे. महिलांना रोजगाराच्या किं वा स्वबळावर उत्पन्नाच्या अत्यल्प संधी प्राप्त होत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचे ७९.७९ वृद्ध पुरुष आणि ८१.१७ वृद्ध महिलांनी सांगितले आहे.हिमांशू रथ अग्रवाल, संस्थापक, एजवेल