शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला पाठीवर उचलून 'तो' धावला अन् वर्ल्ड चॅम्पियन ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 16:15 IST

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि भूमि पेडणेकर यांच्या 'दम लगा के हईशा' सिनेमात पाहायला मिळालेली 'दम लगाओ' या स्पर्धेचं आता जागतिक पातळीवरही आयोजन करण्यात आलंय.

फिनलँड - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि भूमि पेडणेकर यांच्या 'दम लगा के हईशा' सिनेमात पाहायला मिळालेली 'दम लगाओ' या स्पर्धेचं आता जागतिक पातळीवरही आयोजन करण्यात आलंय. तुम्हाला वाचून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे खरंय. 'दम लगा के हईशा' सिनेमात आयुष्मान खुराना ज्या पद्धतीनं भूमि पेडणेकरला आपल्या पाठीवर उचलून घेत कठिणातील कठीण मार्ग पार करत स्पर्धा सहभाग नोंदवतो. अगदी तशाच पद्धतीच्या स्पर्धेच चक्क फिनलँडमध्ये आयोजन करण्यात आले होते. 

फिनलँडमधील सोन्कायार्बी शहरात 'वर्ल्ड वाइफ केअरिंग चॅम्पिअनशिप'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 53 पुरुषांनी सहभाग नोंदवला होता.  या 53 पुरुषांनी आपल्या खांद्यावर आपल्या पत्नीला उचलून घेत जवळपास तासाभराचा रस्ता पार करत स्पर्धेत सहभाग नोंदवला. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही अनोखी स्पर्धा पार पडली.  विशेष म्हणजे गेल्या 23 वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. 

या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी स्पर्धकांना सुरुवातीला क्वॉलिफाइंग राउंडचीही परीक्षा द्यावी लागते. अमेरिका, ब्रिटन, स्वीडन, अॅस्टोनिया यांच्यासहित 13 देशांमधील 53 पुरुषांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. गेल्या शनिवारी पार पडलेल्या या स्पर्धेत लिथुआनियातीस वीतोतस आणि त्याची पत्नी नेरिंगानं विजय मिळवला. पाणी, निसटता पूल, अशा अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी ही स्पर्धा जिंकली आहे. या दाम्पत्यानं 2005मध्ये स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.