शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लिपुलेख, लिम्पियाधुरा, कालापानी आमचाच भाग; नेपाळचा पुनरुच्चार, ओली यांच्या पावलावर देउबांचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 12:04 IST

नेपाळने पुन्हा लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानीचा मुद्दा उपस्थित केला आहे. याप्रकरणी नेपाळची भूमिका पूर्णपणे ठाम असल्याचंही पंतप्रधान देउबा यांनी सांगितलं.

नेपाळने पुन्हा लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानीचा मुद्दा उपस्थित केला आहे. आता पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनीही हे तीन भागांचे नेपाळचा भाग असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी नेपाळची भूमिका पूर्णपणे ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलं. यापूर्वी माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या कार्यकाळातही नेपाळने या भागांवर दावा केला होता.

आपला देश तटस्थ परराष्ट्र धोरण अवलंबत असल्याचं देउबा म्हणाले. नेपाळ सरकारने नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे. शेजारी आणि इतर देशांशी संबंधित बाबींमध्ये आम्ही परस्पर लाभाचे धोरण अवलंबतो. आपल्या भूभागाचे रक्षण करण्यासाठी सरकार सदैव तत्पर असते, असंही त्यांनी सांगितलं. सीमा प्रश्न हा संवेदनशील विषय आहे. आम्ही समजतो की हे प्रश्न संवादातून सोडवले जाऊ शकतात. या दिशेने वाटचाल करत राजनैतिक माध्यमातून प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले.यापूर्वी वादग्रस्त नकाशाला मंजुरीभारतासोबतच्या सीमा विवादादरम्यान नेपाळने २० मे २०२० रोजी मंत्रिमंडळात नवा नकाशा सादर केला होता. ज्याला नेपाळच्या संसदेच्या प्रतिनिधीगृहाने १३ जून रोजी मंजुरी दिली. यामध्ये भारतातील कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा हे नेपाळचा भाग दाखवण्यात आले होते. त्याचवेळी भारताने नेपाळला विरोध केला होता. याशिवाय भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळच्या नव्या नकाशाला ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड केल्याचं म्हटलं होतं.

संबंधांवर परिणामनेपाळच्या या निर्णयाचा भारतासोबतच्या संबंधांवर खोलवर परिणाम होत आहे. भारताने आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सीमेचा वाद चर्चेतून सोडून पुढे जावं लागेल, असं सांगण्यात आले. यानंतर नेपाळने पिथौरागढला लागून असलेल्या सीमेनजीक एक जुना प्रकल्प पुन्हा सुरू केला. हा रस्ता सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे आणि त्याच भागात आहे ज्या ठिकाणी नेपाळ आपला दावा करत आहे.

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारत