शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारताला पाठिंबा देणाऱ्या देशांवर क्षेपणास्त्रांचा थेट हल्ला करू; पाकिस्तानची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:23 IST

पाकिस्तानचे मंत्री अली अमीन यांची विखारी धमकी

इस्लामाबाद : काश्मीरच्या प्रश्नावर जो देश भारताची बाजू घेईल तो पाकिस्तानचा शत्रू असेल व अशा देशावर पाकिस्तान क्षेपणास्त्राने हल्ला करील, अशी विखारी धमकी पाकिस्तानच्या एका मंत्र्याने केली आहे.

पाकिस्तानचे काश्मीर व गिलगिट-बाल्टिस्तान बाबींचे मंत्री अली अमीन गंडापूर मंगळवारी येथे एका कार्यक्रमात म्हणाले की, काश्मीरच्या प्रश्नावर तणाव आणखी वाढत गेला तर पाकिस्तानला नाइलाजाने युद्ध पुराकावे लागेल. त्यामुळे असे युद्ध जेव्हा होईल तेव्हा भारताला पाठिंबा देशांनाही पाकिस्तानचे शत्रू मानले जाईल व भारतासोबत अशा देशांवरही क्षेपणास्त्रांनी हल्ला केला जाईल. पाकिस्तानमधील एक पत्रकार नायला इनायत यांनी मंत्री गंडापूर यांच्या या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडिओ टिष्ट्वटरवर प्रसारित केला आहे.

भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. पाकिस्तानने त्यानंतर भारतासोबतचे राजनैतिक संबंध कनिष्ठ पातळीवर आणले व संधी मिळेल तेव्हा प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतावर बेछूट आरोप केले. पण बहुतेक सर्वच देशांनी काश्मीरच्या प्रश्नावर भारताचीच बाजू घेतली आहे. मंत्री गंडापूर यांचे आताची ही वल्गना त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत केलेल्या भाषणाचीच री ओढणारी आहे.

संयुक्त राष्ट्रांतील संपूर्ण ५० मिनिटांचे भाषण इम्रान खान यांनी काश्मीरवरून भारतावर आगपाखड करण्यात खर्ची घातले होते. काश्मीरवरून भारताशी कदाचित अणुयुद्धालाही तोंड लागू शकेल, असा गर्भित इशारा देत इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांना, ‘चांगलीची आशा करा, पण वाईटात वाईटाचीही तयारी ठेवा’, असे सांगितले होते. (वृत्तसंस्था)शरणागती वा सोक्षमोक्षइम्रान खान म्हणाले होते, ‘युद्धाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने झाली तरी अण्वस्त्रधारी देश जेव्हा प्राणपणाने लढतो तेव्हा त्या युद्धाचे परिणाम त्या देशांच्या सीमांपुरते मर्यादित राहत नाहीत. आपल्याहून सातपट मोठ्या देशाशी लढताना छोटा देश काय करील? एक तर शरणागती पत्करेल किंवा सोक्षमोक्ष लावण्यासाठी लढेल.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान