शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

3 हजार कोटींना विकलं गेलं लिओनार्डो द विंचीचं 500 वर्षं जुनं पेंटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 16:41 IST

न्यू यॉर्क- इटालियन चित्रकार लिओनार्डो दि विंची हे त्यांच्या अप्रतिम चित्रांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. जगविख्यात असलेल्या लिओनार्डो दि विंची यांनी मोनालिसाचं रेखाटलेलं चित्र फारच चर्चेत आलं. त्यांच्या चित्रांना जगभरातून मागणी आहे. अमेरिकेत लिओनार्डो द विंची यांनी बनवलेल्या येशू ख्रिस्तांच्या 500 वर्ष जुन्या पेंटिंगचा 45 कोटी डॉलर म्हणजेच 3 हजार कोटी ...

न्यू यॉर्क- इटालियन चित्रकार लिओनार्डो दि विंची हे त्यांच्या अप्रतिम चित्रांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. जगविख्यात असलेल्या लिओनार्डो दि विंची यांनी मोनालिसाचं रेखाटलेलं चित्र फारच चर्चेत आलं. त्यांच्या चित्रांना जगभरातून मागणी आहे. अमेरिकेत लिओनार्डो द विंची यांनी बनवलेल्या येशू ख्रिस्तांच्या 500 वर्ष जुन्या पेंटिंगचा 45 कोटी डॉलर म्हणजेच 3 हजार कोटी रुपयांना लिलाव झाला आहे. या पेंटिंगचा लिलाव हा जगभरातील सर्वात महागडा लिलाव आहे.

19 मिनिटे चाललेल्या या बोलीवर खरेदीदारानं टेलिफोनवरून बोली लावली आहे. परंतु अद्यापही खरेदीदाराचा नाव उघड करण्यात आलेलं नाही. येशू ख्रिस्तांच्या या पेंटिंगचं नाव साल्वाडोर मुंडी असे आहे. या पेंटिंगनं 2015मध्ये पिकासोची पेंटिंग वुमन ऑफ एल्जियर्सचा लिलावाचाही रेकॉर्ड तोडला आहे. त्या पेंटिंगची विक्री 17.94 कोटी डॉलरला झाली होती. येशू ख्रिस्तांवर रेखाटलेलं हे पेंटिंग हरवलं होतं, परंतु 500 वर्षांपूर्वी या पेंटिंगचा अधिकारी फ्रान्सच्या शाही परिवाराला मिळाला होता. इतकेच नव्हे तर 1950च्या दशकात हे पेंटिंग फक्त 45 पौंड म्हणजेच जवळपास 3900 रुपयांत विकण्यात आलं आहे. 2005मध्ये पुन्हा त्या पेंटिंगचं 10 हजार डॉलरमध्ये लिलाव करण्यात आला होता. तर याच वर्षी रशियाच्या अब्जाधीशानं हे पेंटिंग 12.75 कोटी डॉलरला विकत घेतलं होतं. आता हे पेंटिंग ख्रिस्ती नावाच्या संस्थेनं 45 कोटी डॉलरला खरेदी केलं आहे. एवढ्या मोठ्या किमतीत एखादी व्यक्ती एक विमानही खरेदी करू शकते. ही किंमत एअरबस ए380-800च्या किमतीहूनही जास्त आहे. एअरबस ए380-800ला 43.26 कोटी रुपयांत विकत घेण्यात आलं आहे. तसेच पॅरिस सेंट फुटबॉल क्लबनं यंदा टॉप खेळाडू नेमार यालाही 26.1 कोटी डॉलरमध्ये विकत घेतलं होतं. प्रख्यात चित्रकार लिओनार्डो द विंचींनी मोनालिसाचं रेखाटलेलं फारच चर्चेत आलं होतं. जगातलं पहिलं चित्र असा ज्याचा उल्लेख केला जातो ते लिओनार्डो – द – विंचीनं काढलेलं मोनालिसाचं चित्र सध्या चर्चेत येण्याला कारणही तसंच दमदार आहे. मोनालिसाच्या चित्रासारखं हुबेहूब एक चित्र पॅरिसच्या शास्त्रज्ञांना सापडलं आहे. मात्र त्यातील व्यक्तीच्या अंगावर एकही वस्त्र दिसत नाही. ती व्यक्ती हुबेहूब विंचीच्या मोनालिसासारखी दिसते. या चित्रावर जगभरातील शास्त्रज्ञ आणि कलातज्ज्ञ गेल्या महिनाभर काम करीत आहेत. तेथील एका आर्ट गॅलरीमध्ये या दोन्ही फोटोंवर अभ्यास चालू आहे. आता सापडलेला फोटो विंचीच्या पहिल्या प्रख्यात फोटोचा सुरुवातीचा भाग असण्याची शक्यता तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत.

टॅग्स :paintingचित्रकला