शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानमध्ये भीषण आत्मघाती हल्ला, विद्यार्थ्यांसह १८ जणांचा मृत्यू, ५७ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2020 06:46 IST

suicide attack in Afghanistan News : काबूलमध्ये शनिवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शालेय विद्यार्थ्यांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ५७ जण जखमी झाले.

काबूल (अफगाणिस्तान) - अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये शनिवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शालेय विद्यार्थ्यांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ५७ जण जखमी झाले. गृहमंत्रालायाने सांगितले की, हा बॉम्बस्फोट पश्चिम काबूलच्या दस्त ए बारची येथील शिया बहूल भागात एका शैक्षणिक केंद्राबाहेर झाला. हल्लेखोर शिक्षण केंद्रात घुसण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखले, असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते तारिक अरियान यांनी सांगितले.दरम्यान, या हल्ल्यातील मृतांचा आकडा अजून वाढू शकतो, अशी भीती गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने  वर्तवली आहे. पीडित कुटुंबांकडून रुग्णालयांमध्ये आपल्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. तर तालिबाननेसुद्धा या हल्ल्यात आपला हात असल्याचे नाकारले आहे. यापूर्वी इस्लामिक स्टेटशी संबंधित एका संघटनेने ऑगस्ट २०१८ मध्ये अशाच प्रकारे झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. त्या हल्ल्यात ३४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेटने अल्पसंख्याक शिया, शिख आणि हिंदूंवर मोठ्या हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. काबूलमध्ये इस्लामिक स्टेटचा निष्ठावंत असलेल्या एका बंदुकधाऱ्याने काबूलमध्ये धार्मिक स्थळावर हल्ला करून २५ जणांचा बळी घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात हिंदू आणि शि समुदायातील शेकडो व्यक्तींनी देशातून पलायन केले होते.दरम्यान, या बॉम्बस्फोटापूर्वी शनिवारी पर्व अफगाणिस्तानमध्ये रस्त्याच्या कडेला झालेल्या बॉम्बस्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला होता. या स्फोटामध्ये एक मिनी व्हॅन सापडली होती. गझनी प्रांताच्या पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, दुसऱ्या स्फोटात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे पोलीस कर्मचारी आधी झालेल्या स्फोटातील जखमींच्या मदतीला जात होते.

टॅग्स :Blastस्फोटAfghanistanअफगाणिस्तानTerror Attackदहशतवादी हल्ला