शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

पॉर्न साइटवर आपले फोटो बघून तरूणीला बसला धक्का, म्हणाली - फोटोग्राफरने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 17:39 IST

Girl Photo On Porn Site: तरूणीला अचानक तिचे फोटो एका पॉर्न साइटवर दिसले आणि तिला धक्का बसला. पण हे सगळं तरूणीच्या काहीच लक्षात आलं नाही की, हे कसं झालं.

Girl Photo On Porn Site: तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे की, याचे जसे अनेक होतात तसेच याचे काही नुकसानही आहेत. याचा चुकीचा वापर काही लोक करतात. असंच काहीसं एका तरूणीसोबत झालं. तरूणीला अचानक तिचे फोटो एका पॉर्न साइटवर दिसले आणि तिला धक्का बसला. पण हे सगळं तरूणीच्या काहीच लक्षात आलं नाही की, हे कसं झालं.

अमेरिकेतील एका तरूणीसोबत ही घटना घडली. ती एक मॉडल आहे आणि दोन वर्षाआधी तिने मॉडलिंगमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. काही दिवसांआधी तिला तिच्या काही मित्रांनी फोन करून सांगितलं की, तिचे फोटो पॉर्न साइटवर आहेत. जेव्हा तिने चेक केलं तर खरंच तिचे फोटो तिथे होते.

तरूणीला आधी समजलंच नाही की, हे कसं झालं. पण जेव्हा तिने खोलवर विचार केला तेव्हा आठवलं की, दोन वर्षाआधी तिने एक फोटोशूट केलं होतं. त्यावेळी तिला अंदाजही नव्हता की, तिला हे सगलं इतकं महाग पडेल. हे फोटोशूट एका फोटोग्राफरने केलं होतं. ज्याच्यासोबत तरूणीने कोणतंही एग्रीमेंट केलं नव्हतं. अशात त्या फोटोग्राफरने तिला फसवत फोटो एका पॉर्न साइटला विकले होते.

आता तरूणीला तिची फसवणूक झाल्याचं समजलं. ती त्या फोटोग्राफरवर कोणती केसही करू शकत नाही. कारण तिने त्याच्यासोबत कोणतंही एग्रीमेंट केलं नव्हतं. आता तरूणी फार दु:खी आणि निराश आहे. डेली स्टारसोबत बोलताना तिने सांगितलं की, फोटोशूट करताना याची काळजी घेतली गेली पाहिजे की, त्यांचा चुकीचा वापर होऊ नये.

रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या तरूणीचं वय 21 वर्षे आहे आणि तिचं नाव सावा शुल्ज (Sava Schultz) आहे. तिने स्वत: सांगितलं की, मॉडल करण्याचा विचार केल्यावर तिने एका फोटोग्राफरला संपर्क केला होता. त्याने तिचे अनेक ग्लॅमरस फोटो काढले होते. पण त्यानेच तिला दगा दिला.

टॅग्स :AmericaअमेरिकाfraudधोकेबाजीJara hatkeजरा हटके