शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:31 IST

नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी रोज वेगवेगळी नावे चर्चेत येत आहेत. काठमांडूचे महापौर बालेन शाह, सुशीला कार्की यांच्या नावांनंतर आता ५४ वर्षीय कुलमान घिसिंग यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुढे आले आहे.

भारताचा शेजारी देश नेपाळ गेल्या काही दिवसांपासून जेन-झी आंदोलनामुळे होरपळून निघाला आहे. आता या आंदोलनाची धग कमी झाली असली, तरी अद्याप देशातील तणाव कायम आहे. जेन-झी आंदोलक आता देशात नवं सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, नेपाळच्यापंतप्रधान पदासाठी रोज वेगवेगळी नावे चर्चेत येत आहेत. काठमांडूचे महापौर बालेन शाह, सुशीला कार्की यांच्या नावांनंतर आता ५४ वर्षीय कुलमान घिसिंग यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुढे आले आहे. एकीकडे बालेन शाह यांनी या शर्यतीतून आपलं नाव मागे घेतलं आहे. तर, दुसरीकडे वयोमानामुळे सुशीला कार्की या शर्यतीत मागे पडल्या आहेत.

कुलमान घिसिंग हे वीज महामंडळाचे माजी प्रमुख होते. नेपाळमधील वीज व्यवस्था सुधारण्याचे श्रेय कुलमान यांना दिले जाते. त्यांच्या नेतृत्वातच नेपाळ वीजतुटवडा कमी झाला. त्यांच्या याच कामामुळे जेन-झीचा विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आता घिसिंग यांनी एक असे सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे, ज्यात स्वच्छ प्रतिमा असणारे नेते आणि जेन-झी तरुणांना देखील सामील केलेले असेल. यामुळे कुलमान घिसिंग जेन-झीचे आवडते बनले आहेत आणि देशाचे नेतृत्व त्यांच्या हातात सोपवण्याची मागणी होत आहे. 

या आधी नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव सगळ्यात पुढे होते. मात्र, आंदोलनकर्त्यांचा एक गट त्यांच्या निवडीशी सहमत नाही. सुशीला कार्की यांचे वय ७३ वर्षे असल्याने, नेपाळचे नेतृत्व सांभाळण्यासाठी त्या फारच वयस्कर असल्याचे म्हटले जात आहे. यासोबत, संविधानानुसार माजी न्यायाधीशांना पंतप्रधानपदी विराजमान होता येत नाही. त्यामुळेच आता कुलमान घिसिंग यांच्या नावाला पसंती मिळताना दिसत आहे. मात्र, अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. 

कोण आहेत कुलमान घिसिंग?२५ नोव्हेंबर १९७० रोजी रामेछाप येथील बेथान येथे जन्मलेल्या कुलमान घिसिंग यांनी भारतातील जमशेदपूर येथील रीजनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी नेपाळमधील पुलचोक इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण घेतले. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, त्यांनी आपले नेतृत्व कौशल्य वाढवण्यासाठी एमबीएचे शिक्षण घेतले. कुलमन घिसिंग हे नेपाळच्या वीज मंडळाचे माजी प्रमुख होते. त्यांनी १९९४ मध्ये एनईएमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. काठमांडूतील दीर्घकाळ चालणारी वीज कपात संपवल्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले आहे.

टॅग्स :Nepalनेपाळagitationआंदोलनprime ministerपंतप्रधान