शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने सीरियावर डागली 100हून अधिक क्षेपणास्त्रं, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले 'मोहीम फत्ते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 22:16 IST

आपल्या नागरिकांवर केलेल्या कथित रासानिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियावर 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यानंतर 'कामगिरी फत्ते झाली', अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

पॅरिस/ वॉशिंग्टन - आपल्या नागरिकांवर केलेल्या कथित रासानिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियावर 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यानंतर 'कामगिरी फत्ते झाली', अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. सीरियावर केलेल्या या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्स आणि ब्रिटनचे आभार मानले आहेत. या कारवाईत सीरियाच्या रासायनिक शस्त्रांचा मोठा साठा उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा फ्रान्सने केला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे रशिया आणि इराण हे देश अस्वस्थ झाले आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे. सीरियाविरुद्ध करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत आक्रमक असून यामुळे सीरियातील नागरिकांवरील संकट वाढणार असल्याची भीती पुतीन यांनी व्यक्त केली आहे.

तर दुसरीकडे, इराणचे सर्वोच्च नेते इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियावर केलेला हल्ला हा गुन्हा असून याद्वारे काहीही लाभ होणार नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वीही या देशांनी अशाच कृत्यांचा इराक, सीरिया आणि अफगाणिस्तानाविरोधात अशा कारवाया केल्याचे सांगत तेव्हाही या देशांना काहीच फायदा झालेला नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.  

(सीरियावर अमेरिकेने कशाप्रकारे केला हल्ला?)सीरियावर केमिकल हल्ला केल्यानंतर आता अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियातील सरकार विरोधात मोठी सैन्य कारवाई सुरु केली आहे. या हल्ल्यात तिन्ही देशांना काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला. सीएनएनच्या वृत्तानुसार,  या हल्ल्यात B-1 बॉम्बर्स, टोरनॅडो जेट्सचा वापर करण्यात आला. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पSyriaसीरियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन