शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाच कलमी कार्यक्रम राबवा अन्यथा युद्धासाठी तयार राहा, चीनची भारताला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 11:54 IST

चिनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजिन म्हणाले की, चिनी सैन्य भारतीय टँक नष्ट करण्याचा सराव करीत आहे.

पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी नेते एकीकडे शांततेचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून युद्धाची धमकी देण्यात आली आहे. चिनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजिन म्हणाले की, चिनी सैन्य भारतीय टँक नष्ट करण्याचा सराव करीत आहे.

मॉस्कोमध्ये परराष्ट्र मंत्र्यांमधील पाच कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी भारत सरकारने केली नाही, तर चिनी सैन्य भारताला योग्य उत्तर देण्यास तयार आहे, अशी धमकी त्यांनी दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिलेल्या विधानानंतर चीनला आणखीनच भडकला आहे. चिनी सैन्याच्या दबावामुळे भारतीय लष्कर नरमाईच्या भूमिकेत आलं आहे, असा दावा शिजीन यांनी केला. ते म्हणाले की, पीएनए पँगॉग तलावाजवळ भारत-चीन सीमेवर निर्णायक कारवाईसाठी तैनाती वाढवित आहे. ग्लोबल टाइम्सचे संपादक म्हणाले की, बीजिंग चीन-भारत सीमा विवाद शांततेने सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु त्यांनी आपले सैन्य सज्ज ठेवले आहे.'चिनी सैन्य हिवाळ्यापर्यंत गतिरोध सुरू ठेवण्यास सज्ज'दुसरीकडे ग्लोबल टाइम्सने तज्ज्ञांचा हवाला देत असे म्हटले आहे की, भारत कठोर भूमिका स्वीकारत आहे आणि येत्या थोड्या महिन्यात या दोघांमधील तणाव कायम राहू शकतो. ते म्हणाले की, चिनी सैन्याने हिवाळ्याच्या हंगामापर्यंत गतिरोध सुरू ठेवण्यास तयार राहावे. भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमधील पाच कलमी मुद्द्यांच्या करारानंतरही चीनचे अधिकृत प्रचार माध्यम भारताला धमकावण्यास आणि मानसिक दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने चिनी विश्लेषक झांग शेंग यांचा हवाला देत म्हटले आहे की, भारत पंडित जवाहरलाल नेहरूंच्या चुकांची पुनरावृत्ती करीत आहे. सध्याचे भारत प्रशासन सीमेवर आक्रमक भूमिका घेत आहे. झांग म्हणाले की, सध्याची परिस्थिती 1962च्या वर्षासारखीच आहे. भारत आपल्या स्वार्थासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीने चीनवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. 1962 साली चीन वेगळे होता. त्यावेळी चीन अमेरिकेशी स्पर्धा करीत होता आणि त्यावेळी चीनही रशियापासून वेगळ्या वाटेवर होता. तर भारत त्यावेळी त्या निर्बंधित चळवळीचा नेता होता.

'आंतरराष्ट्रीय वातावरणाचा फायदा घेण्याचा भारताचा प्रयत्न'चिनी विश्लेषकांचा असा आरोप आहे की, सन 1962मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणून जगातील देशांच्या तिसऱ्या नेत्याची पदवीही भारताने गमावली. झांग म्हणाले की, भारत सरकारही नेहरूंच्या रणनीतीवर काम करीत आहे आणि चीन-अमेरिका तणावाचा फायदा उठवू इच्छित आहे. भारताचे संरक्षणमंत्रीही आक्रमक भूमिका घेत आहेत. असा आहे पाच कलमी कार्यक्रम1. सीमाभागाविषयीच्या मतभेदांचं रुपांतर वादात न होऊ देण्यासाठी भारत-चीन संबंध विकसित करण्याच्या दोन्ही देशांच्या नेत्यांच्या सहमतीतून मार्गदर्शन घ्यावं.2. सीमाभागातील सद्यस्थिती कोणत्याही देशाच्या हिताची नाही. त्यामुळे दोन्ही देशाच्या सैन्यानं एकमेकांशी संवाद चालू ठेवावा, एकमेकांपासून योग्य अंतर राखावं आणि तणाव कमी करावा.3. दोन्ही देशांनी सद्यस्थितीतील सगळे करार आणि चीन-भारत सीमाविषयक नियमांचं पालन करावं. सीमाभागात शांतता राखावी आणि तणावामध्ये वाढ होईल अशी कोणतीही कारवाई टाळावी.4. भारत-चीन सीमाप्रश्नावर विशेष प्रतिनिधी यंत्रणेमार्फत संवाद सुरू ठेवावा. या संदर्भात भारत-चीन सीमाप्रश्नावरील सल्लामसलत व समन्वय कार्य मंडळानं बैठकी चालू ठेवाव्यात.5. सीमाभागात परिस्थिती जसजशी सामान्य होईल, तसतसं या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी वेगानं करावी.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव