जेरूसलेम : इस्रायलच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते इस्साक हरझोग (वय ६०) निवडून आले आहेत. नॅसेटमध्ये (संसद) झालेल्या गुप्त मतदानात माजी मजूर नेते हरझोग यांना ८७ मते मिळाली. ते देशाचे ११ वे अध्यक्ष आहेत. हरझोग यांचे वडील चेम हरझोग हे देशाचे १९८३ आणि १९९३ दरम्यान अध्यक्ष होते. इस्रायलच्या माजी अध्यक्षांचा मुलगा अध्यक्ष बनणारे हरझोग पहिलेच. इस्साक हरझोग यांनी १२० सदस्यांच्या संसदेत ८७ सदस्यांचा पाठिंबा मिळवून प्रतिस्पर्धी मिरिएम पेरेटझ यांचा पराभव केला. विद्यमान अध्यक्ष रियुवेन रिव्हलिन यांची जागा हरझोग घेतील व त्यांचा सात वर्षांचा कार्यकाळ ९ जुलै रोजी सुरू होईल.
इस्साक हरझोग इस्रायलचे अध्यक्ष; ८७ सदस्यांच्या पाठिंब्यानं दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 06:25 IST