शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कुवैत परकीयांची संख्या कमी करणार, भारतीय कामगारांची संख्या मोठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 06:08 IST

कोरोनाचा फटका : शेख सबाह अल खालीद यांची माहिती

कुवैत सिटी : कोरोनाची जागतिक साथ आणि इंधनाच्या किमती यामुळे आखाती देशांच्या अर्थव्यवस्थांना घरघर जाणवू लागली आहे. त्यामुळेच आपल्या देशातील स्थलांतरितांची संख्या ७० टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा विचार कुवैत करीत आहे. देशाचे प्रमुख शेख सबाह अल खालीद शेख सबाह यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

आखातातील छोटा देश असलेल्या कुवैतची लोकसंख्या ४.८ दशलक्ष असून, यापैकी ३.४ दशलक्ष हे परकीय नागरिक आहेत. लोकसंख्येच्या सुमारे ७० टक्के असलेले हे स्थलांतरितांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार सध्या सुरू आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील ताण कमी होईल व देशातून बाहेर जाणाऱ्या संपत्तीला आळा बसेल, असे शेख म्हणाले. खनिजतेलाच्या घसरत्या किमतींमुळे अनेक आखाती देशांच्या अर्थव्यवस्था डगमगायला लागल्या आहेत. त्यातच आता कोरोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळेच आखाती देश स्थलांतरितांच्या प्रश्नावर विचार करू लागले आहेत. कुवैतमधील बहुसंख्य परदेशी नागरिक हे अकुशल कामगार असून, ते घरगुती कामगार आहेत. अशी हलकी कामे करण्याची कुवैती नागरिकांची तयारी नसल्यामुळे अशा कामगारांची संख्या मोठी आहे.भारतीय कामगारांची संख्या मोठीजगभरामधून स्थलांतरित होण्याला जर्मनी आणि सौदी अरेबिया या देशांना पसंती मिळत आहे. तसेच मागील वर्षामध्ये संयुक्त अरब अमिरातीने फ्रान्स आणि कॅनडापेक्षा अधिक परदेशी नागरिकांना आकर्षित केले आहे. सध्या कुवैतमध्ये ६.५ लाख घरगुती कामगार असून, त्यांच्यामध्ये फिलिपाइन्स, भारत, श्रीलंका आणि बांगलादेशामधील कामगार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे कुवैतने धोरणात्मक बदल केल्यास त्याचा परिणाम भारतालाही भोगावा लागण्याची शक्यता आहे.