शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव यांच्या भेटीचे काचेआडून सोपस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 07:08 IST

इस्लामाबाद : हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानने फाशीची शिक्षा ठोठावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांच्या पत्नी चेतना व आई अवंतिका यांनी सोमवारी येथे काचेआडून भेट घेतली.

इस्लामाबाद : हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानने फाशीची शिक्षा ठोठावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांच्या पत्नी चेतना व आई अवंतिका यांनी सोमवारी येथे काचेआडून भेट घेतली. अटक झाल्यापासून २१ महिन्यांत जाधव यांना कुटुंबीयांनी भेटण्याची ही पहिलीच वेळ होती.पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीमधील एका खोलीत झालेली ही भेट म्हणजे एका परीने तोंडदेखला सोपस्कार ठरला. कारण जाधव यांना पत्नी व आईला प्रत्यक्ष भेटू दिले गेले नाही. एका काचेच्या तावदानाआडून इंटरकॉमच्या माध्यमातून त्यांना परस्परांशी संवाद साधता आला. काचेतून ते एकमेकांना पाहू शकत होते. परंतु जाधव यांना ज्या खोलीत बसविले होते ती काचेच्या तावदानाच्या पार्टिशनने सीलबंद केलेली होती. त्यामुळे बोलणे व ऐकणे फक्त इंटरकॉमवरूनच शक्य होते.सुमारे ३५ मिनिटे झालेली ही भेट संपल्यावर पाकिस्तान सरकारने तिचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यातील आवाज (आॅडिओ) बंद करून ठेवलेला होता. त्यामुळे भेटीत जाधव माय-लेकाचे व पती-पत्नीचे काय बोलणे झाले हे समजू शकले नाही. अर्थात पाकिस्तानने या भेटीची व्यवस्था ज्या पद्धतीने केली होती ती पाहता या तिघांचे इंटरकॉमवरून सुरु असलेले बोलणे त्याच वेळी (चोरून) ऐकण्याची व ते रेकॉर्ड करण्याची तजवीजही केली गेली असणार हे उघड आहे. हे बोलणे मराठीतून झाले असावे असे गृहित धरले तरी एखाद्या देशाच्या सरकारला कोणत्याही भाषेचे दुभाषे मिळणे हल्लीच्या जमान्यात कठीण नाही. भारताचे इस्लामाबादमधील उप उच्चायुक्त जे. पी. सिंग यांना हजर राहू दिले जाईल, असे पाकिस्तानने आधी सांगितले होते. परंतु भेटीच्या व्हिडिओमध्ये ते कुठे दिसले नाहीत. यावरून कदाचित त्यांना खोलीबाहेर उपस्थित राहू दिले गेले असावे असे वाटते. एखादे ‘हाय सेक्युरिटी इव्हेन्ट’ मानून कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली गेली होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीकडे येणाºया रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करून आसपासच्या इमारतींवर नेमबाज बंदूकधारी जवान तैनात केले गेले होते. माध्यम प्रतिनिधी आणि त्यांच्या ओबी व्हॅन्सही दूर अंतरावर रोखण्यात आल्या. जाधव यांची पत्नी व आई आधी भारतीय उच्चायोगात गेल्या व तेथून त्या भेटीच्या ठिकाणी आल्या.भेटीनंतर लगेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांनी पत्रकार परिषद घेऊन, पाकिस्तानचे संस्थापक काईदे-आझम मोहम्मद अली जिन्ना यांच्या जन्मदिनाचे पावित्र्य राखत शुद्ध मानवतावादी दृष्टिकोनातून ही भेट घडवून आणल्याची फुशारकी मारली. जाधव प्रकरणाचे पाकधार्जिणे असे सवंग व एकतर्फी कथानक सांगून त्यांनी ‘जाधव हे भारतीय दहशतवादाचा चेहरा’ असल्याची गरळ ओकली.थेट भेटू न देता काचेआडून भेट का घडविली, असे विचारता डॉ. फैजल त्याचे समर्थन करत म्हणाले की, काही झाले तरी जाधव हे फाशीची शिक्षा झालेले कैदी आहेत. त्यांना भेटायला आलेल्या आमच्या पाहुण्या होत्या. त्यामुळे सुरक्षेची पुरेपूर काळजी घेणे ही आमची जबाबदारी होती. भेट अशा प्रकारे होईल याची या दोघींना आधीच कल्पना देण्यात आली होती, असेही त्यांनी नमूद केले. पुन्हा केव्हा भेटू देणार, असे विचारता त्यांनी, आजची भेट शेवटची नाही, हे आवर्जून सांगितले. या पत्रकार परिषदेत जाधव यांचे दोन व्हिडिओही दाखविले गेले. त्यातील एक त्यांच्या कथित कबुलीजबाबाचा होता. दुसरा व्हिडिओ सोमवारच्या भेटीनंतरचा असल्याचे सांगितले गेले. ‘पत्नी व आईला भेटू देण्याची मी विनंती केली. ती मोठ्या मनाने मान्य केल्याबद्दल मी पाकिस्तान सरकारचा आभारी आहे’, असे जाधव म्हणत असताना त्यात दाखविले गेले.>दोन वर्षांनंतर मुलाला भेटणाºया आईच्या मनाची स्वाभाविक घालमेल लक्षात घेऊन खरे तर दोघांची प्रेमाने गळाभेट होऊ द्यायला हवी होती. परंतु तसे न करून पाकिस्तानने मनाचा कद्रुपणा दाखवत भेट घडविण्याचा केवळ देखावा केला हे निषेधार्ह आहे.- तुळशीदास पवार, कुलभूषण यांचे बालमित्र>कॉन्स्युलर अ‍ॅसेसचा वाद : भारताने वारंवार मागणी करूनही पाकिस्तानने जाधव यांना ‘कॉन्स्युलर अ‍ॅसेस’ (राजनैतिक अधिकाºयाशी भेट) दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील प्रकरणात भारताने तोच मुद्दा प्रामुख्याने मांडला. भारताच्या उप उच्चायुक्तांना कुटुंबभेटीच्या वेळी हजर राहू देणे हा ‘कॉन्स्युलर अ‍ॅसेस’च आहे, या पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या रविवारच्या विधानाने काही काळ वाद व संभ्रम निर्माण झाला. परंतु पत्रकार परिषदेत प्रवक्त्याने हा ‘कॉन्स्युलर अ‍ॅसेस’ नसल्याचे मान्य केले व तो केव्हा द्यायचा हे योग्य वेळी ठरविले जाईल, असे सांगितले.>थकवा, सचिंत चेहरेव्हिडीओमधील चित्रे चार कॅमेºयांनी टिपलेली होती. त्यात नेव्ही ब्ल्यूरंगाचा कोट घातलेले जाधव वअंगावर शाल पांघरलेली त्यांचीपत्नी व आई हे चेहºयाच्या बाजूने आलटून-पालटून दिसत होते.जाधव यांचा चेहरा थकलेला व ओढग्रस्त दिसत होता तर आई व पत्नीच्या भावमुद्रा चिंता आणि काळजीच्या होत्या. नंतर दाखविलेला जाधव यांचा आभाराचा व्हिडीओ भेटीनंतरचा असल्याचे सांगितले गेले; पण त्यात त्यांच्या अंगावर निळा कोट नव्हता.मुळात जाधव जिवंत आहेत की नाही याची शंका घेणाºयांना गप्प करणे हा व्हिडीओ दाखविण्याचा उद्देश होता. जाधव शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत, असे सांगत प्रवक्त्याने त्यांचा २२ डिसेंबरचा एक मेडिकल रिपोर्टही वाचून दाखविला.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान