शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kulbhushan Jadhav: पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य केला नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 12:24 IST

कोणत्याही देशाला आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य करणं बंधनकारक नाही.

नवी दिल्ली - कुलभूषण जाधव प्रकरणावर आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे भारताला दिलासा मिळाला आहे. संपूर्ण देशात कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करुन आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय ऐकणे हे कोणत्या देशावर बंधनकारक आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्तान कोर्टाने कुलभूषण जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती त्यावर भारताने व्हिएन्ना कराराचा हवाला देत आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं. 

व्हिएन्ना करारावर पाकिस्ताननेही स्वाक्षरी केली आहे. ज्या देशांनी व्हिएन्ना करारावर स्वाक्षरी केली आहे त्या देशांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय ऐकणं बंधनकारक आहे. मात्र पाकिस्तानकडून आलेल्या प्रतिक्रियेनंतर कोर्टाच्या निर्णयावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात पंतप्रधान इम्रान खान आम्ही कोर्टाच्या निर्णयावर पुढील कारवाई करु असं सांगितले आहे. 

अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य केला नव्हताअशीही काही उदाहरणं आहेत ज्या देशांनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य केला नाही. एकदा अमेरिकेच्या कोर्टाने मॅक्सिकोमधील 51 नागरिकांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. तेव्हा मॅक्सिकोने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली. 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय कोर्टाने अमेरिका कोर्टाच्या विरोधात निर्णय दिला. मात्र आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य केला नाही. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयावर ट्वीट करत सांगितले की, कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत करतो. आम्ही या प्रकरणात कायदेशीर बाबी तपासून पुढची कारवाई करणार आहे असं सांगितले. 

 

...तर संयुक्त राष्ट्र संघात प्रकरण जाणार कोणत्याही देशाला आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य करणं बंधनकारक नाही. जर आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय कोणताही देश मान्य करत नसेल तर त्या प्रकरणी संयुक्त राष्ट्र संघाची भूमिका महत्वपूर्ण ठरते. या प्रकरणात संयुक्त राष्ट्र संघात मतदान घेतले जाते. त्यावेळी संयुक्त राष्ट्र संघाची सुरक्षा परिषद पाकिस्तानवर कोर्टाचा निर्णय मान्य करण्यासाठी दबाव बनवू शकते. मात्र या सुरक्षा परिषदेत असणाऱ्या 5 स्थायी देशांपैकी 1 चीनदेखील आहे. चीन नेहमी पाकिस्तानला साथ देतो. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी करण्याच्या वेळी चीनने भारताविरोधात भूमिका घेतली होती. 

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने कायदेशीर बाबी तपासून पाहणार असल्याचं सांगितले. पाकिस्तानच्या कोर्टाने भारतीय व्यक्तीला दिलेली शिक्षेचा आढावा घ्यायला हवा. कारण त्या व्यक्तीविरोधात गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया यासारखे आरोप आहेत. कोर्टाच्या निर्णयामध्ये कुलभूषण जाधव यांना निर्दोष अथवा सोडून देण्याची भारताची मागणी स्वीकार केली नाही.  

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवIndiaभारतPakistanपाकिस्तानAmericaअमेरिका