शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 10:55 IST

Balochistan : पाकिस्तानचा हा सर्वांत मोठा प्रांत जर वेगळा झाला तर नवा देश म्हणून त्याचे स्वरूप कसे असेल, त्याचा नकाशा कसा असेल,  अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात...

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होत आहे. पाकिस्तानचा हा सर्वांत मोठा प्रांत जर वेगळा झाला तर नवा देश म्हणून त्याचे स्वरूप कसे असेल, त्याचा नकाशा कसा असेल,  अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात...

पाकिस्तानवर काय परिणाम होणार?पाकिस्तानच्या एकूण नैसर्गिक वायू आणि खनिजाचे ४० ते ५० टक्के साठे एकट्या बलुचिस्तान प्रांतात आहेत. पाकिस्तानची २० ते ३० टक्के अर्थव्यवस्था यावर अवलंबून आहे. बलुचिस्तान वेगळे झाले तर पाकच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसेल. याशिवाय ‘चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर’ आणि ‘वन बेल्ट वन रोड’ योजना अडचणीत आल्यामुळे पाकला अब्जावधी रुपयांचे नुकसान होईल. चीनच्या महत्त्वाकांक्षानाही धक्का बसेल.  

ताकद : खनिज संपत्तीने समृद्ध, सोने, कोळसा विपुल४० ते ५० प्रकारचे खनिज भांडार२० ट्रिलियन क्युबिक फीट नैसर्गिक वायू५.९ बिलियन टन खनिज२ टक्के तांबे३५० टन सोने२०० मिलियन टन कोळसा२०० मिलियन लोह खनिज 

क्षेत्रफळाच्या दृष्टीने काय?बलुचिस्तानचे क्षेत्रफळ ३,४७,१९० वर्ग किमी आहे. यात अरबी समुद्रालगत ७०० किलोमीटर लांब किनारपट्टीचा समावेश आहे. ही किनारपट्टी इराण आणि अफगाणिस्तानला जोडते. 

भारतासाठी काय?  : बलुचिस्तानचे स्वतंत्र होणे म्हणजे भारतासाठी सामरिक स्थिती मजबूत होणे. यामुळे चीनचा प्रभाव कमी होईल. पाकिस्तानची लुडबुड नसल्यामुळे दहशतवादी अड्डे बंद होतील. बलुचिस्तानची खनिज संपत्ती आणि बंदरे यांचा भारताला मोठा उपयोग होऊ शकतो. का वेगळे होऊ इच्छितात बलुच? : पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देऊनही बलुच नागरिकांना त्याचा फायदा मिळत नाही. 

तांबे आणि सोन्याचे भांडारबलुचिस्तानच्या रेको डिक खदानीत तांबा, सोने तसेच सुई गॅस फिल्ड येथे नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचप्रमाणे ४० ते ५० इतर खनिजेही या परिसरात आहेत. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा हा कणा समजला जातो. कसे असेल बलुचिस्तान?

क्षेत्रफळाच्या दृष्टीने बलुचिस्तान जगातील ६५ वा आणि लोकसंख्येच्या दृष्टीने १७८ वा देश असेल. जर्मनी, मलेशिया, इटली, ओमान, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, न्यूझीलंडसारख्या देशांपेक्षाही बलुचिस्तान मोठा असेल. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान