शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

किम जोंग उनने हद्दच केली! एका पाठोपाठ एक दोन वेळा बॅलेस्टिक मिसाइलचा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 8:49 PM

अमेरिकेने बजावूनही उत्तर कोरियाने केली चाचणी

North Korea Missile : उत्तर कोरियाने पुन्हा एकदा दक्षिण कोरियाला धमकावणारी क्षेपणास्त्रे डागली आहेत. यावेळी किम जोंग उनच्या सैन्याने कमी पल्ल्याच्या क्षेपाणास्त्रा सोबतच लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्रही सोडले आहे. उत्तर कोरियाच्या लष्कराने सोमवारी केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर दक्षिण कोरियाने हा इशारा दिला. दक्षिण कोरियाने ते लांब पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असण्याची शक्यता चाचणीनंतर व्यक्त केली होती. किमचे सैन्य दररोज समुद्रात क्षेपणास्त्रांची चाचणी घेते आणि अशा स्थितीत उत्तर कोरियाचा संरक्षण मित्र असलेल्या अमेरिकेच्या अडचणी वाढतात. दक्षिण कोरियाने अमेरिका आणि जपानलाही याबाबत माहिती दिली आहे. जपानच्या संरक्षण मंत्रालयानेही बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीची माहिती दिली असून, हे क्षेपणास्त्र जपानच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनच्या बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, चाचणीच्या वेळी या भागात एकही जहाज नव्हते.

अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर क्षेपणास्त्र चाचणी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तज्ञांच्या मते, उत्तर कोरियाच्या सतत वाढत्या क्षेपणास्त्र चाचण्या हा कदाचित उत्तर कोरियाच्या वाढत्या आण्विक धोक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आण्विक प्रतिबंधक योजनांना चालना देण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने उचललेल्या पावलांचा निषेध असावा. नुकतीच दक्षिण कोरिया आणि अमेरिकन अधिकाऱ्यांची वॉशिंग्टनमध्ये बैठक झाली. याच्या निषेधार्थ उत्तर कोरियाकडून ताजी चाचणी करण्यात आल्याचे समजते.

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला धमकी दिली होती

उत्तर कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकन आणि दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. उत्तर कोरिया प्रत्युत्तरात कठोर भूमिका घेईल, अशी धमकी दिली. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा म्हणाले की, जखमी किंवा नुकसानीचे कोणतेही वृत्त नाही. उत्तर कोरिया दररोज क्षेपणास्त्र चाचणी घेतो, दक्षिण कोरियाला धमकावतो. शेकडो क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे, ज्यामध्ये कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांव्यतिरिक्त आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचीही चाचणी घेण्यात आली आहे.

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उन