शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Kim Jong Un: किम जोंग उनच्या डोक्यावर रहस्यमय जखम; बँडेजने लपविण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 17:13 IST

Kim Jong Un Health: किम जोंग उनच्या छोटा मेंदू असते तिथे एक डाग दिसत आहे. हा डाग कशाचा आहे, कसा बनला ते माहिती नाही. किम सोल्जर कट ठेवत असल्याने कानाच्या वरपर्यंत केस कापलेले असतात. यामुळे डोक्यावरील त्वचा दिसत आहे.

प्योंगयांग : उत्तर कोरिया हा आपल्या देशातील घडामोडी गुप्त ठेवण्यासाठी जेवढा चर्चेत असतो, तेवढेच हुकुमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) देखील एक रहस्यच बनलेला असतो. सध्या त्याच्या प्रकृती अस्वास्थ्यावरून चर्चा सुरू असून समोर आलेल्या फोटोंमध्ये किम खूपच अशक्त आणि थकलेला, वजन कमी झालेला दिसत होता. आता आणखी एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये किमच्या डोक्यावर मागील बाजुला मोठी पट्टी लावलेली दिसत आहे. (Big Mark on Kim jong un's head, covered by bandage)

Kim Jong Un: किम जोंग उन पुन्हा आजारी! वजन घटलेले, शरीर थकलेले...नवे फोटो धक्कादायकNK न्यूज ने काही फोटो शेअर केले आहेत, यामध्ये किम जोंग उनच्या छोटा मेंदू असते तिथे एक डाग दिसत आहे. हा डाग कशाचा आहे, कसा बनला ते माहिती नाही. किम सोल्जर कट ठेवत असल्याने कानाच्या वरपर्यंत केस कापलेले असतात. यामुळे डोक्यावरील त्वचा दिसत आहे. महत्वाचे म्हणजे काही फोटोंमध्ये हा डाग बँडेजद्वारे झाकलेला दिसत आहे. गडद हिरव्या रंगाची ही खून एखाद्या जखमेसारखी किंवा डोक्यात मागून कोणीतरी प्रहार केल्यासारखी भासत आहे. 

वृत्तानुसार 24 ते 27 जुलैला एका मिलिट्री इव्हेंटवेळी ही खून दिसली होती. जूनमध्ये ही खून दिसली नव्हती. तर नंतरच्या 27-29 जुलैला झालेल्या एका वॉर वेटरन कॉन्फ्रेन्समध्ये देखील ही खून दिसली होती. 

किम जोंग उन हा त्याच्या क्रूरतेसाठी ओळखला जाते. छोट्या छोट्या चुकांवरून किम अधिकाऱ्यांना मृत्यूदंडासारखी शिक्षा करतो. हाच किम जोंग उन सध्या आजारी आहे. किम जोंग उन याचे गेल्या वर्षभरात 20 किलोंनी वजन कमी झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा सैन्य दलातील अधिकाऱ्यांना अभिवादन करतानाचा फोटो समोर आला होता. महत्वाचे म्हणजे एक महिन्याआधीच तेथील सरकारी मीडियाने किमच्या आरोग्यावर चिंता व्यक्त केली होती. इतरवेळी किम यांच्या आरोग्याची चर्चा होत नाही, तसेच याबाबतची माहिती लपविली जाते. मात्र, आता त्यांच्या घटलेल्या वजनावर चर्चा होऊ लागली आहे व चिंताही व्यक्त होत आहे.

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया