शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

किम जोंग उनने जनरलला दिली अंगाचा थरकाप उडवणारी क्रूर शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 19:48 IST

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा किरकोळ बाबींसाठी क्रूर शिक्षा सुनावण्यासाठी कुप्रसिद्ध आहे

प्योंगयाँग - उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा किरकोळ बाबींसाठी क्रूर शिक्षा सुनावण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. दरम्यान, किम जोंग उनच्या क्रौर्याची अशीच एक घटना समोर आली आहे. किम जोंगने एका जनरलला नरभक्षक पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकून मृत्युदंड दिल्याचे वृत्त आहे. पिरान्हा मासे हे दक्षिण अमेरिकेत आढळतात. या माशांचे कळप त्यांच्या तीक्ष्ण दातांमुळे माणसालासुद्धा फाडून खाते. उत्तर कोरियाने हे मासे ब्राझीलमधून आयात केले होते. या माशांनी भरलेल्या टँकमध्ये फेकून या जनरला मृत्युदंड देण्यात आला.  

मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आलेल्या जनरलवर सत्तापालट करण्याचा कट आखल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दरम्यान 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या जेम्स बॉण्डच्या यू ओन्ली लिव्ह ट्वायसमधील घटनेचा आधार घेत या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. या चित्रपटात मृत्युदंडाची अशी क्रूर शिक्षा चित्रित करण्यात आली होती. दरम्यान, उत्तर कोरियामधून याआधीही अधिकाऱ्यांना अशाप्रकारच्या क्रूर शिक्षा सुनावण्यात आल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या. मात्र काही वेळा अशा बातम्या खोट्या असल्याचेही समोर आले होते. तसेच मृत्युदंड दिल्याचा दावा करण्यात आलेले मृत अधिकारी काही काळाने सर्वांसमोर आले होते. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेशी वाटाघाटी निष्फळ ठरल्यानंतर किम जोंग याने 16 वरिष्ठ अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिल्याचे समोर आले होते. 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया