शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लादेनला ठार मारणाऱ्या सील कमांडोने पुतीनला म्हटलं 'वेडा'; दिला भयानक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 19:23 IST

आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करणाऱ्या 'नेव्ही सील'ने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत एक इशारा दिला आहे. दहशतवादी मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनसोबत जे केलं ते अमेरिका पुतीनसाठी करू शकत नाही.

वॉशिग्टंन- 

आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करणाऱ्या 'नेव्ही सील'ने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत एक इशारा दिला आहे. दहशतवादी मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनसोबत जे केलं ते अमेरिका पुतीनसाठी करू शकत नाही. यासोबतच नेव्ही सीलने रशियाच्या आक्रमणाबाबत आपल्याच देशाच्या भूमिकेवरही टीका केली आहे. 

मोंटानाचा रॉब ओ नील हे SEAL च्या टीम सिक्सचा भाग होते. ज्या टीमनं 2010 मध्ये अबोटाबादमध्ये 9/11 चा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेनला ठार मारले होते. रॉब ओ नील यांनी 16 वर्षात 400 युद्ध मोहिमा पूर्ण केल्या आहेत. युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारणं म्हणजे व्लादिमीर पुतीन यांचा संयम सुटल्याचं लक्षण आहे. रॉब यांनी युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याला आपल्या देशाच्या प्रतिक्रियेवर टीका केली. अमेरिकेने या प्राणघातक हल्ल्याला कमकुवतपणं उत्तर दिलं, असं रॉब यांनी म्हटलं आहे. 

'डेली मेल'च्या वृत्तानुसार अमेरिका पुतीनला रोखण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या हवामान बदलाच्या अजेंड्याबाबत अधिक चिंतीत दिसत असल्याची टीका रॉब ओ नील यांनी केली आहे. रशिया आणि चीन आज आपल्यावर हसत आहेत, असंही ते पुढे म्हणाले. ओ'नीलचा दावा आहे की बहुतेक अमेरिकन लोकांना युद्धाबद्दल त्यांचे विचार टीव्ही आणि सोशल मीडियावरून मिळतात. अमेरिकेने रशियाबाबत कठोर भूमिका घ्यावी असे लोकांना वाटते. 

लादेनच्या डोक्यात झाडल्या होत्या तीन गोळ्यामे 2011 मध्ये अल कायदाचा प्रमुख आणि जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्याचे मिशन पार पडले होते. या मिशनमध्ये सहभागी असलेल्या नेव्ही सील टीमच्या रॉब ओ'नीलने ओसामावर शेवटचा हल्ला केला होता. नीलने दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या डोक्यात तीन गोळ्या झाडल्या होत्या. या संघातील कोणत्याही सदस्याची ओळख उघड झाली नव्हती. 

नीलची ओळख अशी उघड झालीअमेरिकन वृत्तवाहिनी फॉक्सने नीलची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांची ओळख सार्वजनिक करण्यात आली. रॉब ओ'नील यांचे पूर्ण नाव रॉबर्ट ओ'नील आहे. सध्या तो नेव्ही सीलचा भाग नाही. या मुलाखतीत ओ नीलने मिशन ओसामाशी संबंधित अनेक किस्से समोर आणले होते. 

टॅग्स :Osama Bin Ladenओसामा बिन लादेनUSअमेरिकाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन