शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

मारले गेले की परागंदा झाले? सीरिया सोडून पळालेले बशर अल असद आहेत कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 18:08 IST

Bashar Al Assad News: सीरियामध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रपती बशर अल असद यांची सत्ता उलथवून लावण्यात आली. त्यानंतर बशर अल असद यांनी राजधानी दमिश्क येथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ज्या विमानातून प्रवास करत होते, ते विमान बंडखोरांनी पाडल्याचा दावा करण्यात येत आहे.

सीरियामध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रपती बशर अल असद यांची सत्ता उलथवून लावण्यात आली. त्यानंतर बशर अल असद यांनी राजधानी दमिश्क येथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ज्या विमानातून प्रवास करत होते, ते विमान बंडखोरांनी पाडल्याचा दावा करण्यात येत आहे. ओपन सोर्स डेटा ट्रॅकर फ्लाईट रडार २४.कॉमने दिलेल्या माहितीनुसार दमिश्क विमानतळावरून एका सीरियन विमानाने उड्डाण केले होते. हे विमान सुरुवातीला सीरियाच्या किनारी भागात जात होते.

मात्र उड्डाण केल्यानंतर विमानाने अचानक आपली दिशा बदलली तसेच विरुद्ध दिशेला काही मिनिटांपर्यंत प्रवास केल्यानंतर हे विमान रडारवरून गायब झाले.  या विमानाचं लास्ट लोकेशन होम्स शहराजवळ होते, हा भाग बंडखोरांच्या ताब्यातील क्षेत्र म्हणून ओळखला जातो. फ्लाइटच्या डेटानुसार रडारवरून गायब होण्यापूर्वी विमानाची उंची ३ हजार ६५० मीटरवरून १ हजार ७० मीटरपर्यंत खाली आली होती. त्यावरून या विमानावर हल्ला झाला किंवा काही तांत्रिक बिघाडामुळे ते दुर्घटनाग्रस्त झाल्याचे संकेत मिळत आहेत.

मात्र डेटामध्ये काही विसंगती असू शकतात, हे फ्लाईटरडारने मान्य केलं आहे. त्यांनी त्यासाठी विमानाचे जुने ट्रान्स्पाँडर आणि परिसरामधील जीपीएस जॅमिंगला जबाबदार धरले आहे. मात्र त्यांनी उपलब्द असलेला डेटा विमानाच्या फ्लाय वे ची चांगली माहिती देतो, असेही सांगितले.

दरम्यान, या विमानामधून कोण कोण प्रवास करत होते हे समोर येऊ शकलं नाही. मात्र रॉयटर्सने सीरियन सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, बशर अल असद यांना घेऊन जाणाऱ्या या विमानाच्या थ्री डी फ्लाइट डेटामधून हे विमान कोसळले असण्याची शक्यता आहे. सीरियन एअरचं आयएल-७६ विमान हवेतून वेगाने खाली आलं. तसेच ते पाडण्यात आलं असण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय