शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 22:32 IST

मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाचे दर वाढू शकतात, अशी चिंता त्यांना (ट्रम्प) वाटू लागली आहे...

इराण-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती शिगेला पोहोचल्या आहेत. एक वेळ कच्च्या तेलाचा दर 81.40 अमेरिकन डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला होता. यातच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (23 जून, 2025) तेलाचे दर कमी ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाचे दर वाढू शकतात, अशी चिंता त्यांना वाटू लागली आहे. 

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, "सर्वांनी तेलाच्या किमती कमी ठेवाव्यात, मी बघत आहे. आपण शत्रूच्या हाताने खेळत आहात. असे करू नका." याशिवाय, ट्रम्प यांनी अमेरिकन ऊर्जा विभागाला संबोधित करत आणखी एक पोस्ट केली, यात त्यांनी त्यांना "ड्रिल, बेबी, ड्रिल" करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि "माझा अर्थ आत्ताच आहे," असे म्हटले आहे.

इराणचे महत्व... जागतिक बाजारपेठेत चिंता -जागतिक तेल पुरवठ्यासंदर्भात इराणचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींसंदर्भात चिंता वाढली आहे. OPEC+ च्या एकूण उत्पादनात इराणचा वाटा सुमारे एक तृतीयांश आहे. महत्वाचे म्हणजे, तो या गटातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. यामुळे त्याच्याकडून होणाऱ्या पुरवठ्यात कसल्याही प्रकारचा व्यत्यय आला, तर त्याचा फटका जागतिक ऊर्जा बाजारपेठांना बसू शकतो. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर, इराणने प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली तर, हे प्रकर्षाने जाणवू शकते. कारण हा एक महत्त्वाचा शिपिंग मार्ग आहे येथून जगातील सुमारे २० टक्के तेलाची आयात-निर्यात होते. 

किती वाढू शकतात दर - इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेतली आहे. यामुळे आता, होर्मुझच्या सामुद्रधुनीत कसलाही अडथळा निर्माण झाला, तर कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यामुळे अमेरिकास्थित WTI ८० ते ८५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पCrude Oilखनिज तेलIranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिका