शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

ब्रिटनची राजकन्या केट मिडलटन यांच्या फोटोवरून प्रचंड वाद, मागावी लागली माफी, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 16:37 IST

तिने फोटो एडिट केल्याचे मान्य केले आहे

Princess Kate Middleton: ब्रिटनची राजकुमारी केट मिडलटनने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोमुळे राजघराण्यावर काही प्रमाणात टीका झाली, कारण हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. केटने शेअर केलेला फोटो खरा नसून एडिट केलेला असल्याचा लोकांचा समज होता. आता या कौटुंबिक फोटोबाबत पसरलेल्या गोंधळाबद्दल केटने माफी मागितली आहे. तिने फोटो एडिट केल्याचे मान्य केले आहे. केन्सिंग्टन पॅलेसने हे चित्र प्रसिद्ध केले, ज्यामध्ये केट तिच्या तीन मुलांसह बसलेली दिसली. हा वाद इतका वाढला की गेटी, रॉयटर्स, असोसिएटेड प्रेस आणि एएफपीसह अनेक वृत्तसंस्थांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून केटचे फोटो काढून टाकावे लागले.

प्रिन्सेस केटवर जानेवारीमध्ये पोटाची शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतरचा तिचा पहिला फोटो १० मार्च रोजी समोर आला. हा फोटो तिचा पती प्रिन्स विल्यम याने काढला होता. हा फोटो काढण्यावरून वाद सुरू झाला. तिच्या हातात एंगेजमेंट रिंग नसल्याचे बोलले गेले. केटच्या मुलीच्या कार्डिगनचा स्लीव्ह भाग नीट दिसत नव्हता, त्यामुळेच बहुतांश वृत्तसंस्थांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हे चित्र काढून टाकले, असेही सांगण्यात आले. हे चित्र ब्रिटनमध्ये मदर्स डेच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आले होते.

एडिट केलेल्या फोटोबद्दल केटने माफी मागितली

चित्रात केट मिडलटन तिच्या तीन मुलांसह प्रिन्स जॉर्ज, प्रिन्सेस शार्लोट आणि प्रिन्स लुईसह हसताना दिसली. सोशल मीडिया साइटवर तिने लिहिले, “अनेक हौशी छायाचित्रकारांप्रमाणे, मी कधीकधी एडिटींगचा प्रयोग करते. "आम्ही काल शेअर केलेल्या कौटुंबिक फोटोबद्दल कोणत्याही गोंधळाबद्दल मी दिलगीर आहे. राजघराण्याला मदर्स डे साठी औपचारिक कौटुंबिक फोटो सादर करायचा होता, म्हणून हा फोटो प्रिन्स ऑफ वेल्सने छंद म्हणून काढल्याचे पॅलेसच्या सूत्रांनी सूचित केले आहे.

केट मिडलटन कोण आहे?

केट मिडलटन ही किंग चार्ल्स आणि राजकुमारी डायना यांचा मोठा मुलगा प्रिन्स विल्यम्स यांची पत्नी आहे. दोघांनी 2011 मध्ये लग्न केले. त्यांना तीन मुले आहेत - प्रिन्स जॉर्ज, राजकुमारी शार्लोट आणि प्रिन्स लुई. केट यांच्याबाबतीत वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी एका पुस्तकात असा दावा करण्यात आला होता की मिडलटनला लग्नाआधी प्रजनन चाचणी करावी लागली कारण ती कोणत्याही राजघराण्यातून आली नव्हती.

टॅग्स :Englandइंग्लंडViral Photosव्हायरल फोटोज्