पाकिस्तानमधील प्रमुख शहर असलेल्या कराचीमधील एका शॉपिंग प्लाझाला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून ६१ पर्यंत पोहोचली आहे. येथील एकाच दुकानामधून ३० हून अधिक मृतदेह सापडल्यानंतर मृतांचा आकडा वेगाने वाढला आहे. दरम्यान, हा आकडा वाढून १०० च्या पुढेही जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुकानदार आणि ग्राहकांनी आगीपासून वाचण्यासाठी शटर बंद करून घेतलं होतं. मात्र आग भडकल्यान ते आतच अडकले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या कराचीमधील गुल शॉपिंग प्लाझाच्या बेसमेंटमध्ये १७ जानेवारी रोजी रात्री आग लागली होती. हे ठिकाण घाऊक आणि किरकोळ बाजारा म्हणून वापरात होते. येथे भडकलेली आग बराच वेळ भडकलेली होती. तसेच ती वेगाने संपूर्ण इमारतीत पसरली. दरम्यान, सुमारे ३६ तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
या घटनेबाबत कराची साऊथचे डीआयजी असद रजा यांनी सांगितले की, मेजेनाइज फ्लोअरवर असलेल्या दुबई क्रॉकरी नावाच्या दुकानामध्ये ३० मृतदेह सापडले आहेत. दुकानदार आणि ग्राहकांनी आगीपासून वाचण्यासाठी शटर बंद करून घेतलं होतं. मात्र आग भडकल्यान ते आतच अडकले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला असावा.
याआधी आगीच्या पहिल्या दिवशी ३ मृतदेह सापडले होते. त्यामुळे मृतांची संख्या ही २८ वरून वाढून ३१ झाली होती. तसेच येथे सापडलेल्या मोबाईल फोनमुळे हे लोक शनिवारी रात्री मेजेनाइज फ्लोअरवर उपस्थित होते, हे स्पष्ट होत आहे.
Web Summary : A massive fire in a Karachi shopping plaza killed 61. Over 30 bodies were found in one shop. People closed shutters to escape the blaze, trapping themselves inside. The fire took 36 hours to control.
Web Summary : कराची के एक शॉपिंग प्लाजा में भीषण आग लगने से 61 लोगों की मौत हो गई। एक दुकान में 30 से अधिक शव मिले। आग से बचने के लिए लोगों ने शटर बंद कर दिए, जिससे वे अंदर फंस गए। आग पर काबू पाने में 36 घंटे लगे।